अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांचा आगीच्या दुर्घटनेत मृत्यू
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण अशा अग्नी कांडाची दुर्दैवी घटना घडली.शनिवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. अतिदक्षता विभागात 17 कोरोना रुग्ण उपचार घेत होते याच विभागात आग लागण्याची दुर्दैवी घडली त्यात उपचार घेत असलेल्या 10 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अन्य काही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटने बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.रुग्णालय अग्नी कांडाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून ही चौकशी आता विभागीय आयुक्ता मार्फत केली जाणार आहे.त्या साठी आयुक्ताच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून ही दुर्दैवी घटना घडल्याचे म्हटले आहे. या घटनेची चौकशी विभागीय आयुक्त करणार असून त्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.सरकारने फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊन ही अशा प्रकारच्या घटना घडतात ही दुर्दैवी बाब असल्याचे हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हटले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon