पोलीस जमादाराने लाच मागितल्याची तक्रार ; पोलीस अधीक्षकांनी केली निलंबणाची कार्यवाही

पोलीस जमादाराने पैसे मागितल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षकांनी निलंबणाची कार्यवाही केली.
परभणी : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात मारहानीचे प्रकरण दखल झाले होते. या प्रकरणात मदत करतो म्हणून पैसे मागितल्याची तक्रार पोलीस जमादार यांच्या विरोधात दाखल झाली होती. तक्रारीची चौकशी झाल्यानंतर पोलीस जमादाराने पैसे मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे आढळून आल्याने जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निलंबणाची कार्यवाही केली आहे.

 कोतवाली पोलीस ठाण्यात एक मारहानीची घटना झाल्याचे प्रकरण दाखल झाले होते. या प्रकरणात मदत करण्यासाठी जमादार संभाजी पंचांगे यांनी पैसे मागितल्याची तक्रार उप विभागीय पोलीस अधिकार अविनाश कुमार यांच्याकडे एका व्यक्तीने केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर जमादार संभाजी पंचांगे यांनी पैसे मागितल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जमादार संभाजी पंचांगे यांच्या निलंबणाचा अहवाल अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडे पाठवण्यात आला होता.अहवालची सत्यता पडताळून जमादार संभाजी पंचांगे यांच्यावर निलंबणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng