बाणेर मधील एका इमारती मध्ये डिव्हाइन स्पा नाव असलेल्या मसाज केंद्रात वेशा व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका पोलीस कर्मचाऱ्याला ग्राहक बनवून त्या मसाज केंद्रात पाठवले. त्यानंतर पोलिसांना वेशा व्यवसाय चालतो अशी खातर जमा झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाडटाकून कार्यवाही केली.
या कार्यवाहीत मसाज सेंटर मालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे तर तीन तरुणींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात प्रवीण धोंडीराम दुरगुडे (25 रा. दिघी ) याच्यासह चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मनीषा पुकाळे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon