अहमदनगर : कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची व मुलाची हत्या


कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व मुलाची केली हत्या, माहेरच्या मंडळींनी पतीच्या भावाचे घर दिले फुकून 
श्रीरामपूर : (Husband kills wife and child over family dispute)कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात कुदळ मारून खून केला तर मुलाला गळफास देऊन हत्या केली. तालुक्यातील दिघी येथील चितळी रोडवर रविवारी सकाळी सव्वा दहाच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.या घटणेबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला. दरम्यान मृत महिलेच्या माहेरच्या मंडळीकडून तिच्या पतीचा भाऊ जिवन दत्तात्रय कुदळे याचे घर पेटवून दिले. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जिवीत हानी टळली. मात्र घरातील सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अक्षता बलराम कुदळे (वय 28) व शिवतेज बलराम कुदळे (वय साडेचार वर्ष ) अशी मयत माय लेकराची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलराम कुदळे हा पत्नी अक्षता व मुलगा शिवतेज यांच्या सोबत गोंधणी येथे रहात होता.बलराम हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिवाह चालवत असे.मात्र नाग्नानंतर थोड्यातच दिवसात त्यांच्यात वाद व्हायले लागले.त्यामुळे पती-पत्नी एकमेकांपासून वेगळे राहू लागले असताना त्यांना मुलगा झाला.त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. त्यांनी निमगाव खैरी येथे घर घेऊन राहू लागले मात्र पुन्हा त्यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली.

रविवारी सकाळी बलराम कुदळे व त्याची पत्नी अक्षता यांच्यात वाद झाला. वाद एवढा वाढला की रागाच्या भरत बलराम ने पत्नी अक्षता च्या डोक्याय कुदळ मारली. अक्षताचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बलराम ने साडेचार वर्षाच्या शिवतेज या मुलाला गळफास देऊन हत्या केली.पोलिसांनी आरोपी बलराम याला अटक केली आहे.

याप्रकरणी अक्षदाचे वडील प्रकाश ज्ञानदेव बोरावके (रा.पढेगाव ता.श्रीरामपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बलराम दत्तात्रय कुदळे( 35) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा तर, दत्तात्रय गुलाब कुदळे (सासरा ),जिवन दत्तात्रय कुदळे (भाया ), सुजाता जिवा कुदळे (जाऊ )आणि नणंद सुरेखा दिनू रासवे यांच्या विरुद्ध कौटुंबिक हिंसाचार या कालमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मृत अक्षदाच्या माहेरच्या मंडळींनी अक्षदाचा अंत्यविधी सासरच्या घरासमोर करण्याचा निर्णय घेतला मात्र पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र खाडे यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला.
Previous
Next Post »