लसीकरणा बाबतीत बेजबाबदार पणा,नियमाचे पालन न करणे कर्मचाऱ्यांना उद्धट बोलणे असा ठपका वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र देशमुख यांच्यावर ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी देशमुख यांना निलंबित केले आहे.
परभणी : कोविड लसीकरण करून घेण्यात उदासीन आणि बेजबाबदारपणा तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हापरिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी गंगाखेड तालुक्यातील पिंपळदारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र देशमुख यांना निलंबित केल्याचा आदेश 14 डिसेंबर रोजी काढला आहे.
कर्मचाऱ्यांना उद्धट बोलणे, महिला कर्मचाऱ्यासोबत गैर वर्तन, कर्मचाऱ्यांच्या अंगावर वस्तू फेकणे आणि निलंबणाची भीती दाखवणे अशा प्रकारच्या तक्रारी डॉ रवींद्र देशमुख यांच्या विरोधात आल्या होत्या. तसेच लसीकरण मोहिमेत निष्काळजी आणि बेजबाबदार पणा, नियमांचे पालन न करणे असे अनके तक्रारीचा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी डॉ रवींद्र देशमुख यांच्या विरोधात मुख्याधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या कडे दिला होता. या अहवालची गंभीर गंभीर दखल घेत दि 14 डिसेंबर रोजी डॉ रवींद्र देशमुख यांच्या निलंबणाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काढले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon