पियुष जैन यांच्याकडे 284 कोटींच्या बेशोबी मालमत्ते सह सापडले 23 किलो सोनं आणि 300 किलो चंदन
कानपुर : उत्तर प्रदेशातील कानपुर येथील अत्तर व्यावसायिक पियुष जैन याच्या घरी DGGI ने टाकलेल्या धाडीत आणखी कोट्यावधीचे सोनं व चंदन सापडलं आहे. या आधी आय कर विभागाने टाकलेल्या धाडीत 284 कोटींची मालमत्ता सापडली होती.देशभरात या कार्यवाहीबाबतीत सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. तपासाची कार्यवाही सोमवारी तब्ब्ल 120 तासांनी संपली त्यावेळी करोडोच्या रोख रक्कमेसह 23 किलो सोने सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.पियुष जैन हे कानपुर व कन्नोज येथील अत्तर व्यापारी आहेत.त्यांचा सोने तस्करीमध्ये सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणातील कार्यवाही पूर्ण झाल्याचे DGGI चे अतिरिक्त संचालक झाकीर हुसैन यांनी सांगितले आहे.आम्हाला जे सोनं मिळालेलं आहे ते आम्ही डी आर आर आय कडे दिलं असून 19 कोटींची रोख रक्कम सापडली असून ती स्टेट बॅंक ऑफ इंडिया मध्ये जमा केली केली असून पुढील तपास चालू असल्याचे सांगितले आहे.
पियुष जैन कडे सापडल्या 23 किलो सोन्याच्या विटा
पियुष जैन यांच्या घरी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात सोन्याच्या विटा आणि बिस्कीट सापडली आहेत.यावरून हे सोनं तस्करी करून आणल्याचे तपास यंत्रनेने संशय व्यक्त केला आहे.डीजीजी ने केलेल्या कार्यवाहीत पियुष जैन यांच्या घरी सापडलेलं 23 किलो सोनं हे दुबई वरून तस्करी करून आणल्याचं अधिकाऱ्यांचा संशय आहे.पियुष जैन यांच्याकडे सापडलेली बेशोबी मालमत्तेचे धागेदोरे दुबई पर्यंत आणि सोन्याच्या तस्करी पर्यंत संबंध जोडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासातील अधिकाधिक सोनं हे बाहेर देशातील असल्याचे दिसून येत आहे.
पियुष जैनचे दुबई कनेक्शन असल्याचा संशय
बेशोबी मालमत्ता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीजीजीआयच्या टीम ने हे प्रकरण गुप्तचर महसूल संचालनालायकडे सोपविले आहे.या प्रकरणी तब्ब्ल सहा दिवस चौकशी सुरु होती. सोमवारी 27 डिसेंबर रोजी तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.पियुष जैन यांच्या कानपुर येथील घरात सापडेल सोनं हे दुबई वरून आणल्याचा संशय आहे. कारण दुबई मध्ये सोन्यावर कर लावला जात नसल्याने मोठ्याप्रमाणात काळ्या पैशाची गुंतवणूक सोन्यात करून सोन्याच्या तस्करीचा मार्ग पियुष जैन याने अवलंबला असल्याचा अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान वडिलोपार्जित सोनं विकून पैसे मिळवले असल्याचा दावा पियुष जैन याने केला आहे. परंतु आपण कर भरला नव्हता असं म्हणत करा ची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम मला परत द्यावी अशी मागणी पियुष जैन यानी तपास यंत्रणेकडे केली आहे.परंतु 23 किलो सोन्यासोबत 300 किलो चंदनही डीजीजीआयच्या पथकला सापडले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon