परभणी : भीमनगर येथे रस्त्याच्या कामाचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते भूमिपूजन ; अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी केली वचन पूर्ती.

परभणी शहरातील भीमनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आ. सुरेश वरपुडकर यांचे हस्ते करण्यात आले असून रस्ता करून देण्याचे आश्वासन सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी केलं पूर्ण.
परभणी : परभणी शहरातील भीमनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांनी भीमनगर वासियांना दिले होते. आज प्रत्यक्षात रस्ता कामाचे भूमिपूजन आ. सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील रस्ता मागील 20 वर्षांपासून खराब झालेला होता.

मागील महिन्यात रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी भीमनगर येथील नागरिकांनी सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्याकडे केली असता त्यांनी स्वखर्चातून रस्ता करून देण्याचे आश्वासन भीमनगर वासियांना दिले होते.आज प्रत्यक्षात रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करून नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची आज त्यांनी वचन पूर्ती करून दिलेला शब्द पाळला असल्याची भावना नागरिकांत व्यक्त केली जात आहे.मागील 20 वर्षांपासून भीमनगर वासियांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या रस्त्याचा प्रश्न आज मार्गी लागल्यामुळे नागरिकांत आनंद व्यक्त होत आहे.

याप्रसंगी पाथरी विधानसभा मतदार संघांचे आमदार सुरेश वरपुडकर,काँग्रेस अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे, विजय राव वाकोडे, माधवराव हातागळे, राणूबाई वायवळ, गौतम मुंढे, अशोक कांबळे,मनोहर सावंत,विश्वनाथ मोरे,नगरसेवक रामा गुजर,ज्ञानोबा टोम्पे,शेख मतीनभाई, बाबुराब पंडित,बाबुराव वाघमारे,मिठू भाई शेख निजाम, सुधीर कांबळे,चंद्रशेखर साळवे,भिकाजी कदम, भगवान सांडवे आणि राजेंद्र ताटे इत्यादी उपस्थित होते.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng