परभणीत रस्ता व नालीच्या कामासाठी वंचित आघाडीचे उपोषण


                   (प्रतिनिधिक चित्र )

शहरातील वांगी रोडचे व नालीचे अर्धवट काम अनेक दिवसापासून रखडले असून ते पूर्ण करण्यासाठी वंचित आघाडीने उपोषण सुरु केलं
परभणी : शहरातील वांगी रस्ता व नाली अनेक दिवसापासून ना दुरुस्त आहे. रस्त्याचे काम अर्धवट केलं असून अनेक दिवसापासून तसच आहे त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याने रस्ता व नाली त्वरित करून द्यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 16 डिसेंबर रोजी रस्त्यावरच बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.

शहरातील वांगी रोड परिसरात रोड आणि नालीचे काम अनेक दिवसापासून अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये - जा करताना त्रास सहन करावा लागतो.रस्ता आणि सीसी नालीचे काम पूर्ण करावे यासाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलन देखील केलं होत. तेव्हा नगरपालिका प्रशासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करून दिलं जाईल अस आश्वासन देखील दिलं होतं परंतु आता पर्यन्त कुठलचं काम पूर्ण केलं नाही.नाली नसल्याने पावसाळ्यात नालीचे घाण पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरते.त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

त्यासाठी नाली व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच रमाई आवास घरकुल योजनेतील शिल्लक असलेले धनादेश वाटप करण्यात यावेत व याभागातील नागरिकांना नळाचे पाणी पुरविण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.वंचित बहुजन आघाडीचे शेख युसूफ कलीम यांनी उपोषणास सुरवात केली असून यावेळी वंचितचे डॉ धर्मराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आलमगीर खान,एन जी खंदारे,लिंबाजी उजगरे,संदीप खाडे,आजमत खान, मिलिंद खंदारे,अशोक वायवळ, लखन सौंदरमल आणि सिद्धार्थ शिवभगत आदी उपस्थित होते.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng