पुणे : कोंढव्यात गोडाऊनला भीषण आग ; सुट्टीवर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने दाखवली कर्तव्य दक्षता

पुण्यात गोडाऊनला आग, सुट्टीवर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने प्रसंगावधान दाखवत विझवली आग, मोठा अनर्थ टळला.
पुणे : कोंढव्यातील गोडाऊनला दुपारच्या वेळेस भीषण आग लागली होती. सुट्टीवर असलेल्या अग्निशमन दलाचे जवान राहुल बांदल यांना माहिती मिळताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत केली. विशेष म्हणजे सुट्टीवर असताना देखील आपली कर्तव्य दक्षता सिद्ध केली आहे.

शहरात आगीच्या घटना नेहमीच घडतात. अशीच एक घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पुण्यातील कोंढावा भागात घडली.पिसोळी येथील हॉटेल आंबेकर जवळ असलेल्या एका घरत गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने घरत आग लागली. शेजारीच रहात असलेल्या रोहित सोनी यांनी तात्काळ त्यांचे मित्र राहुल बांदल यांना फोन लावला. राहुल बांदल हे सुट्टीवर असल्यामुळे घरीच होते. त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत प्रसंगावधान दाखवत सिलेंडरवर पाईप द्वारे पाणी मारून सिलेंडर विझवून बाहेर काढले. त्यामुळे मोठी हानी टाळली.

 दरम्यान त्यांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला देखील माहिती दिली होती.स्थानिकांच्या मदतीने पाणी मारून सम्पूर्ण आग आटोक्यात आणण्यात आली.मात्र काही प्रमाणात घरगुती सामानाचे नुकसान झाले आहे.परंतु आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सुट्टीवर असलेले जवान राहुल बांदल यांनी आपली कर्तव्य दक्षता दाखवली. त्याबद्दल तेथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केल आणि अग्निशमन दलाचेही आभार व्यवक्त केले.

Previous
Next Post »