कन्नड घाटात मिनी बस पुलावरून कोसळली ; जखमींना रुग्णालयात पाठवले, जीवीत हानी नाही.

मिनी बस पुलावरून खाली कोसळून मोठा अपघात घडल्याची घटना कन्नड घाटात घडली, बी आर एस पी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील कन्नड घाटात मिनी बस पुलावरून खाली कोसळ्याची घटना आज घडली. अपघात एवढा भयानक होता कि भरधाव वेगात असलेली मिनी बस पुलावरील संरक्षक कठडा तोडून खाली कोसळली. दरम्यान बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे हे कन्नड तालुका दौऱ्यावर जात असताना हा अपघात घडल्याचे त्यांच्या निदर्शनात आल्यामुळे त्यांनी जखमींना वाचविले आहे.

 अरविंद कांबळे यांच्या सोबत असलेल्या सहकार्याच्या मदतीने अपघातात नदीत कोसळलेल्या मिनी बस मधून जखमींना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.दोन पुरुष, एक महिला व एक लहान बालक या मिनी बस मधून प्रवास करत होते. किशोर सिंग कालू सिंग चितोडिया  (29 )रा.लक्ष्मी नगर,प्रतिभा नगर,बस स्टॅन्ड जवळ चाळीसगाव, जिल्हा जळगाव हा युवक मिनी बस चालवत असताना अपघात झाला. सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे कळते. अपघातात कुठलीही जिवीत हानी झाली नाही.अरविंद कांबळे यांच्या सोबत असलेले सचिन बनसोडे,विष्णू वाघमारे आणि सुनील पट्टेकर यांनी प्रसंगावधान दाखवून अपघातग्रस्तांचे जीव वाचविले आहेत.अरविंद कांबळे आणि त्यांच्या सहकार्यांना सलाम.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng