कोरोना लसीकरण : विभागीय आयुक्तांनी सीईओला काढले बैठकीतून बाहेर

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली हिंगोली जिल्हा आढावा बैठक 

हिंगोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले
हिंगोली : विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतीबंधक लसीकरण संबंधित आढावा बैठक बोलावली होती. लसीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने चालू असल्याने 100 टक्के लसीकरण तिसऱ्या लाटेनंतर ही पूर्ण होणार नाही अशी नाराजी व्यक्त करत आरोग्य विभाच्या अधिकाऱ्यासोबत इतर विभाच्याही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.तसेच लसीकरण बाबतीत चुकीची माहिती देणाऱ्या कळमनुरी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला बैठकीतून हाकलून दिले.

लसीकरण बाबतीला आढावा घेण्यासोबत इतरही विविध विभागाची आढावा बैठक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बोलावली होती.या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हापरिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ही बैठक विशेष करून कोरोना लसीकरण संबंधाने बोलावली होती.परंतु बैठकीत इतरही बाबीचा आढावा त्यांनी घेतला.राज्यातील ओमायक्रोनची संख्या वाढत असून तिसरी लाट येण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण का झाले नाही याबाबतीत विचारना केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावत सर्व यंत्रनांनी गावपातळीवर जाऊन लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.

तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि बस स्थानक, रेल्वे स्थानक या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करावेत आणि लसीकरण पूर्ण करून घ्यावेत अशा सुचा देखील करण्यात आल्या. तसेच कोविडची संभाव्य लाट येण्याचा धोका लक्षात घेता सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या.तसेच लसीकरण बाबतीत चुकीची माहिती दिल्याबद्दल कळमनुरी नगर पालिकेच्या सीईओला चुकीची माहिती देता का म्हणून धारेवर धरत त्यांना बैठकीतून बाहेर हाकलून दिले. सोबतच गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना गावापातळीवर जाऊन लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.
Previous
Next Post »