पुण्यात सोशियल मीडियावर धारदार शस्त्र दाखवून भाई गिरी ; समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांना शस्त्र विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

सोशिअल मीडियावर धारदार शस्त्र दाखवून दहशत निर्माण करणाऱ्याला अटक, 4 धारदार कोयते जप्त 
पुणे : सोशिअल मीडियाच्या माध्यमातून धारदार शस्त्र दाखवत समाजात दहशत निर्माण करनाऱ्या कोयता भाई ला पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या.इंस्टाग्राम या सोशियल मीडियावर हातात कोयता घेऊन भाई गिरीची भाषा करून विरोधी गटाला आव्हान देण्याचा व त्यांना उकसावण्यासाठी विडिओ प्रसारित केला होता. 

समाज माध्यमावर विडिओ वायरल झाल्याने दहशत निर्माण करणारे कृत्य केल्याप्रकारणी पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी पथकाने कोयता भाई तेजस नितीन वायदंडे आणि त्याचा साथीदार अभय शिवप्रसाद सुपेकर याला अटक केली असून त्यांच्याकडून 4 धारदार कोयते जप्त केले आहेत. हे दोघे गुन्हेगारी वृतीचे असून त्यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसात या अगोदर अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
तेजस वायदंडे याची दुसऱ्या कोण्या गुन्हेगारी पार्श्वभूम असणाऱ्याशी दुश्मनी असल्याने हातात कोयते घेऊन छातीवर वार केल्यावर कसं होईल, 'अशी धमकी देणार विडिओ बनवून समाज माध्यमावर (social media ) प्रसारित करण्यात आला आहे. परंतु अशा प्रकारेचे विडिओ समाज माध्यमावर (social media ) टाकून समाजात दशत निर्माण करण्याचा प्रयत्न तेजस वायदंडे  आणि अभय शिप्रसाद सुपेकर या दोघांनी केला आहे. व्हिडिओ संदर्भात पिंपरी चिंचवड शस्त्र विरोधी शाखेला माहिती मिळताच तपासाची चक्र फिरवली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपिंना पकडून 4 धारदार कोयते जप्त करत बेड्या ठोकल्या.
       (आरोपी कडून जप्त केलेली धारदार शस्त्र )
तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली शस्त्र विरोधी पथकातील      एएसआय लखन कुमार वाव्हळे, एएसआय भरत गोसावी, एएसआय शामराव शिंदे, पो ह. नामदेव वडेकर, पो ह. चंद्रकांत गवारी, पो.ह प्रीतम वाघ,पो.कॉ मोसीन आतार आणि पो.कॉ प्रवीण मुळीक यांच्या पथकाने कार्यवाही करत आरोपिंना बेड्या ठोकल्या आहेत.
Previous
Next Post »