कौटुंबिक वादातून पत्नी व सासूवर जावयाने केला गोळीबार
पुणे : शिरूरमध्ये न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालय परिसरात दोन महिलांवर गोळीबार झाला असून हा गोळीबार जावयाने केला असल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला असून सासू गंभीर रित्या जखमी झाली आहे.या घटनेमुळे न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटने नंतर पोलीस बंदोबस्तात मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे.याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील शिरूर न्यायालय परिसरात दोन महिलांवर गोळीबार करण्यात आला असल्याची घटना घडली.ह्या दोन महिला मायलेकी आहेत. त्यांच्यावर जावयानेच गोळीबार केला आसल्याची माहिती मिळाली आहे. जावयाने केलेल्या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर रित्या जखमी झाली असून प्रकृती चिंता जनक आहे.सदरची घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचे कळते. न्यायालयात कौटुंबिक वाद सुरु असल्याने आज या कुटुंबाची तारीख होती. यावेळी न्यायालय परिसरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली.घटने नंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जावयाने केलेल्या गोळीबारात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर रित्या जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीसांचे शोध कार्य चालू आहे. न्यायालय परिसरात गोळीबाराची घटना पहिल्यांदाच घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon