पनवेल : पनवेल मध्ये कोट्यावधी रुपयांची वीज चोरी केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. वीज चोरी प्रकरणातील आरोप हा व्यावसायिक असून त्याचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. या आरोपीने एका आठवड्यात तब्ब्ल 1.15 कोटी रुपयांची वीज चोरी केली आहे. याच आरोपीला मागील आठवड्यात विजचोरी प्रकरणात 1.3 कोटी रुपये दंड ठोठावला होता.मागील वेळी दंड वसुल करून सोडून देण्यात आले होते मात्र पुन्हा वीज चोरी केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पनवेल मध्ये स्टोन क्रशर चा उद्योग करणाऱ्या व्यवसायिकाने कोट्यावधी रुपयाची चोरी केल्याचे उघड झाले आहे. एका आठवड्यात तब्बल 1.15 कोटी रुपयांची वीज चोरी केली असून त्याला मागील आठवड्यात वीज चोरी प्रकरणी तब्ब्ल 1.30 कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. कोट्यावधीची वीज चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव जियाउद्दीन पटेल असे असून त्याचा स्टोन क्रशर चा उद्योग आहे.
आरोपीने कमी रिडींग दाखविण्यासाठी वीज मीटर मध्ये छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच अनुसंगाने त्याच्या दुसऱ्या ठिकाणी असलेल्या युनिटवर सुद्धा महावितरणने छापा टाकून तपासणी केल्याचे वृत्त न्यूज 18 प्रसिद्ध केलं आहे.
या प्रकरणी जियाउद्दीन पटेल आणि त्याच्या इतर दोन साथीदार यांच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दरम्यान मीटर रिडींग अनियमितते विरोधात मोहीम राबवणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon