कृषी कायदे रद्द करण्याच्या संबंधाने सोमवारी सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार असल्याने शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे
सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते परंतु ज्या प्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे वापस घेत असल्याची घोषणा केली होती त्यासाठी हे तीन कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी संसदेत मांडण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले असल्याने शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधात निघणारा ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक मांडण्यात येणार आहे त्यामुळे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घरी वापस जाण्याचे आवाहन केले होते. कृषी कायदे रद्द करण्यासाबंधीचे विधेयक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंडण्यात येत असल्यामुळे आंदोलन शेतकऱ्यांचा प्रास्तावित ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.शेतकऱ्यावरील गुन्हे मागे घेण्यासंबंधी व नुकसान भरपाई हे मुद्दे राज्य सरकारच्या अधिकारात येतात असे नरेंद्र तोमर यांनी सांगितले आहे.सरकारच्या या घोषणे नंतर शेतकरी संघटनाची संयुक्त बैठक पारपडली त्यात भविष्यातील रणनीती ठरविण्यात आली आली असून या बैठकी नंतर संयुक्त किसन मोर्चाने सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी होणारा प्रस्तावित ट्रॅक्टर मोर्चा स्थगित केल्याचे जाहीर केले आहे.
संयुक्त किसन मोर्चाची पुढील बैठक 4 डिसेंबर ला होणार असल्याचे यावे सांगण्यात आले आहे.4 डिसेंबर पर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या तर ठीक आहे नसता पुढील रणनीती ठरविण्यात येईल असे किसन मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शेतकरी नेते म्हणले की हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करण्या आधीच ट्रॅक्टर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आता तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासंबंधी विधेयक संसदेच्या हिवाळी आदिवेशानात मंडण्यात येणार असल्यामुळे आम्ही ट्रॅक्टर मोर्चा स्थगित करत आहोत.तसेच 4 डिसेंबर पर्यन्त आमच्या उर्वरित मागण्या मान्य न केल्यास पुढील रण नीती ठरविण्यात येईल असेही यावेळी शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे
ConversionConversion EmoticonEmoticon