बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने औरंगाबाद शहरात संविधान दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेस संबोधित करताना औरंगाबाद शहराची ओळख ही कचऱ्याचे शहर अशी असलल्याचे ऍड. डॉ सुरेश माने यांनी म्हटलं आहे
औरंगाबाद :26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्यावतीने औरंगाबाद शहरातील पुंजाबाई चौक इंदिरा नगर गारखेडा परिसर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांनी औरंगाबाद शहराच्या विकासाची पोलखोल केली. ज्या पक्षांच्या लोकांना आता पर्यंत निवडून दिले त्यांनी वॉर्डाचा आणि शहराचा कोणता विकास केला. रस्ते नाल्या आणि पिण्याच्या पाण्याची समस्या अजून आहे तशीच आहे. औरंगाबाद शहराची ओळख ही कचऱ्याचे शहर असल्याचा उल्लेख डॉ माने यांनी केला.संविधानाने दिलेल्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर करून प्रस्थापित पक्षांच्या सत्ता धाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहनही उपस्थित जनतेला केले.
बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आपल्या आई बहिणीच्या इज्जत्ती एवढीच आपलेल्या मिळालेल्या मताची इज्जत केली पाहिजे असेही डॉ माने यांनी म्हटले. मतदारांनी विकावू न बनता आपल्या हक्क अधिकारासाठी मताचा योग्य वापर केला पाहिजे. एनआरसी आणि सीएएच्या संबंधाने केंद्रातील भाजपा सरकार हे मुस्लिम विरोधी षडयंत्र रचत आहे.याचे ही गांभीर्य मुस्लीम समाजाने घ्यावे. त्यासाठी भाजपा सरकार ला उखडून टाकण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले.मुस्लीम समाजाला 5 टक्के शैक्षणिक आरक्षण देण्यासंबंधी राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ऍड. डॉ सुरेश माने यांनी केला आहे.
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी औरंगाबाद शहराचा महापौर हा बीआरएसपीला विचारत घेतल्याशिवाय होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. औरंगाबाद शहरात सर्वात जास्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि मजबूत पक्ष संघटन असून इतर प्रस्थापित पक्षांकडे एवढे मजबूत संघटन नसल्याचे अरविंद कांबळे यांनी याप्रसंगी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बीआरएसपीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्याप्रमाणात प्रवेश करत आहे.
संविधान दिनानिमित्त सध्या जगात सर्वात जास्त गाजत असलेला जयभिन चित्रपट यावेळी दाखवण्यात आला. यावेळी बीआरएसपीचे मराठवाडा संघटक प्रमुख ऍड.कपिल खिल्लारे, परभणी जिल्हाध्यक्ष मनिष वाव्हळे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला बहुजन समाजातील स्त्री पुरुष आणि युवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनामी मोरे यांनी केले तर आभार नुसरत सर यांनी मानले.
ConversionConversion EmoticonEmoticon