राज्यसभेच्या 4 राज्यातील 16 जागांचा निकाल जाहीर
मुंबई - नवी दिल्ली : राज्यसभेच्या 4 राज्यातील 16 जागेसाठी काल दि 10 जून रोजी मतदान पारपडल्यानंतर मतमोजणी ला सुरुवात झाली. कर्नाटक आणि राजस्थान मधील निकाल लवकर जाहीर झाला. मात्र महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये मतदान प्रक्रियेचे उल्लंघन झाले अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केल्यामुळे रात्री उशीरा पर्यंत मतमोजणी थांबविण्यात आली होती.महाराष्ट्रातील राज्यसभेच्या अटीटतीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने (bjp) 3 जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाच्या धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे.महाराष्ट्रातून भाजपाने पियुष गोयल,अनिल बोन्डे आणि धनंजय महाडिक या तिघांनी विजय मिळवला आहे तर महाविकास आघाडीतील संजय राऊत (शिवसेना ), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी ) व इम्रान प्रतापगडी (काँग्रेस ) हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली असून एकप्रकारे सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.
कर्नाटकामधून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, अभिनेता जग्गेश,व विधान परिषद सदस्य लहर सिंह सिरोया हे भाजपाचे (bjp) 3 उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे जयराम रमेश हे निवडून आले आहेत. या ठिकाणी जेडीएसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. राजस्थान मधून काँग्रेस ने बाजी मारली असून तीन जागावर विजय मिळवला आहे तर भाजपाला एका जागेवर विजय मिळाला आहे.या ठिकाणी काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाला,प्रमोद तिवारी व मुकुल वासनिक या तीन काँग्रेस उमेदवारचा विजय झाला आहे.
हरियाणा मध्ये दोन जागासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने (bjp) कृष्णलाल पंवार यांच्या रूपाने विजय मिळवला तर एक अपक्ष कार्तिकेय शर्मा यांनी बाजी मारली. या ठिकाणी एक भाजपा व एक काँग्रेस प्रत्यकी एक एक जागा मिळेल असा अंदाज असताना अपक्ष उमेदवार कार्तिकेयन शर्मा यांनी विजय मिळवत काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अजय माकन यांचा मात्र पराभव झाला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon