मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली मंत्रिमंडळ बैठक, 'ओमीक्रॉम' विषाणू संबंधी चर्चा होण्याची शक्यता


कोरोनाच्या ओमीक्रॉम या नव्या विषाणूच्या भीतीने नियोजन करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे
कोरोनाचा नवा विषाणू 'ओमीक्रॉम ' हा दक्षिण आफ्रिकेत आढळला असून जगभारत पाय पसरत असल्याचे दिसून आले आहे.या विषाणूचा वाढता संसर्ग वेग आणि बदलत असलेली अनितीशय घातक अशी विषाणूची रचना यामुळे जागतिक पातळीवर याबाबतीत चिंता वाढत आहे.त्यामुळे जगातील अनेक देशांनी खबरदारी घेण्याची तयारी सुरु केली आहे.त्याच संबंधाने महाराष्टात सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजन आणि उपाय योजना करण्यासाठी पावलं उचली जात आहेत.त्यासंबंधाने सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार असून 'ओमीक्रॉम' विषाणू बाबतीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

ओमीक्रॉम हा विषाणू डेल्टा पेक्षाही अधिक वेगाने पसरणारा आहे त्यामुळे अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.प्रधानमंत्री मोदींनी सुद्धा या संबंधाने शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत तातडीची बैठक घेऊन सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.याच पार्शवभूमीवर महाराष्टाला सर्वाधिक फटका बसला असल्याने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध लावले जात आहेत.त्याच अनुसंगाने मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले आहे.त्याच संबंधाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड संबंधी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.या बैठकीत विडिओ कॉन्फरेनसिन्ग च्या माध्यमातून राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
Previous
Next Post »