शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यावर गुन्हे नोंद करा -अजिबात पवार

           (प्रतिनिधिक चित्र )
बनावट रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आजीत पवार यांनी दिले आहेत.
राज्यातील कापूस,सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीर पणे उभे आहे.असून कापूस आणि सोयाबीन हे केंद्र सरकारच्या अधिकारात येतात त्यामुळे याबाबतीत राज्यासरकारचे शिष्टमंडळ प्रधानमंत्र्यांना भेटणार आहे. तसेच येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात महाविकास आघाडीचे खासदार याबाबतीत असलेले प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री आजीत पवार यांनी बुधवारी दिले आहे. याचबरोबर खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री आजीत पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोयाबीन -कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नाबाबतीत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,अन्न व प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजु शेट्टी(व्हीसीद्वारे), स्वाभिमानी शेतकरी नेते रविकांत तुपकर, डॉ ज्ञानेश्वर टाले,दामूअण्णा इंगोले तसेच नियोजन विभागाचे अप्पर मुख्यसचिव डेबाषिश चक्रवर्ती, वित्त विभागाचे अप्पर मुख्यसचिव मनोज सैनिक, मदत व पुनर्वसन प्रधान सचिन असीम गुप्ता,सहकार व पणन सचिव अनुप कुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार (विसीद्वारे ),सहकार आयुक्त अनिल कवडे (व्हिसी द्वारे ),पणन विभागाचे संचालक सुनील पवार (व्हीसीद्वारे )यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बँकांनी शेतकऱ्यांचे अनुदान कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये
राज्यातील अतिवृष्टीने नुकसान ग्रसताना राज्यसरकारच्या वतीने मदतीचे वाटप सुरु झाले असून त्याला आणखीन गती देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत आणि अनुदान बँकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवू नये. तसेच शेतकऱ्यांना दिली जाणारी मदतिची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा करू नये या संबंधिच्या सर्व सूचना संबंधित बँकाना देण्यात येणार आहेत.तसेच बनावट रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यातील नदीकाठील ज्या जमिनी खरडून गेल्या आहेत त्या जमिनी तयार करण्यासाठी रोजगार हमी योजनेसह 'सीएसआर' निधीतून मदत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या आहेत.कृषी पंपाद्वारे दिवसा सुरळीत आणि पुरेसा वीज पुरवठा करण्यात यावा त्याकरिता सरकारने सौरऊर्जा योजना आणली असून ही योजना अधिक सक्षम पणे राबविण्यात यावी असे निर्देश दिले आहेत.जे शेतकरी कर्जमाफीला पात्र आहेत त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरु झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
Previous
Next Post »