गंगाखेड : डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक घरातून समता सैनिक दलात सहभागी व्हावे, "असे आवाहन भन्ते धम्मसार यांनी केले.परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड शहरातील सिद्धार्थ नगर येथे दि 16 मार्च रोजी समता सैनिक दलाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी मार्गदर्शन करता भन्ते धम्मसार यांनी उपस्थित भीम सैनिकांना मार्गदर्शन करताना समता सैनिक दलाची उभारणी करण्याची आवश्यता असल्याचे म्हटले आहे. समता सैनिक दलाच्या माध्यमातून संघटित होऊन अन्याय अत्याचाराविरोधात लढा उभा करण्याची आज अत्यन्त गरज आहे.
या प्रसंगी गंगाखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले, रामराव सावंत, आर जी मस्के,बी जी वाळवंटे, सीताराम जंगले, गोपीनाथ कांबळे,डॉ अरविंद लोणकर,डॉ सिद्धार्थ वसेकर,विजय सावंत,सुबोध अंगलगावकर,संदीप एंगडे,आकाश भराडे,सुदर्शन भराडे आदींची उपस्थिती होती.
तसेच 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंती दिनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना समता सैनिक दलाच्या पथ संचालनाद्वारे मानवंदना देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यासाठी समता सैनिक दलात सहभागी होणाऱ्या सदस्यांना तीन दिवशीय प्रबोधन आणि शारीरिक प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
या पथ संचालनात गंगाखेड व तालुक्यातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिद्धार्थ कांबळे,लक्ष्मण व्हावळे,गुणवंत कांबळे,देवराव जंगले,सिद्धोधन सावंत,निवृत्ती केदारे,कैलास झुंजारे,शाम अवचार,चंद्रगुप्त घनसावंत,भागवत जंगले,अशोक जंगले,विशाल कांबळे, प्रज्ञा कांबळे,तेजश्री घोबाळे,सागर कांबळे,नैतिक व्हावळे यांनी केलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon