सर्वात आधी देशातील शेतकरी आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी म्हटलं आहे
प्रधानमंत्री मोदींनी तीन कृषी कायदे वापस घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर शनिवारी तेलंगणा राष्ट्रसमिती प्रमुख तथा मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी हैदराबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली सोबतच केंद्र सरकाने पीडित शेतकऱ्यांच्या परिवाराला 25 रुपये मदत देण्याची मागणी सुद्धा केली आहे.
हैदराबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर राव म्हणले की तेलंगणा सरकारने या मानवतावादी कार्यासाठी 22 कोटी रुपये दिले असून शेतकरी आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्यांची नावे कळविण्याची विनंती शेतकरी नेत्याकडे केली आहे.तीन केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असताना जवळ पास 700 शेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
तीन काळे कायदे वापस घेत असल्याच्या प्रधानमंत्री यांनी केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आणि या आंदोलनात शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल झालेत ते सर्व गुन्हे वापस घेण्याची मागणी केंद्र सरकार कडे मागणी केली आहे.तसेच देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात किमान आधारभूत किंमती संबंधी विधेयक आणि कायदा आणण्याची तसेच भारतीय अन्न महामंडळाद्वारे वार्षिक खरेदी धोरण अगोदर लागू करण्याची मागणी सुद्धा चंद्रशेखरराव यांनी यावेळी केली.
चंद्रशेखर राव यांनी वीज दुरुस्ती विधेयक मागे घेण्याच्या मागणी सोबतच तेलंगणा सरकाने केलेल्या विनंतीनुसार खरीपासाठी धान आणि रब्बी मध्ये उकडलेले तांदूळ खरीदी वाढविण्यासंबंधी केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे असेही चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे
ConversionConversion EmoticonEmoticon