गंगाखेड नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी निलंबीत

गंगाखेड नगर पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंगडे यांनी पदाचा गैर वापर करून 9 कोटीच्या वर्कऑर्डर रद्द केल्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले
परभणी :गंगाखेड नगरपालिकेत विविध भागात विविध कामासाठी 9 कोटीच्या कामाला मंजुरी देण्यात येऊन वर्क ऑर्डर सुद्धा निघाली होती परंतु गंगाखेडचे नायब तहसीलदार तथा नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर धोंगडे यांनी तांत्रिक कारण दाखवून 1 नोव्हेंबर रोजी निविदा आणि वर्कऑर्डर रद्द केल्या प्रकरणी त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी निलंबित केले आहे.

गंगाखेड नगरपालिकेअंतर्गत विविध प्रभागात वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत आठ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये डांबरी कारण, सिमेंट रोड, नाली बांधकाम, पेव्हर ब्लॉक या कामासंबंधीची ई -निविदा 12 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली होती. या कामाची निविदा 29 ऑक्टोबर मंजूर करून वर्कऑर्डर सुद्धा देण्यात आली होती.त्यानंतर दुसरी निविदा सी सी नाला,रस्ता, फूटपाथ याकामासाठी दि 13 ऑक्टोबर रोजी ई -निविदा प्रसिद्ध झाली होती आणि 29 ऑक्टोबर रोजी निविदा मंजूर होऊन कार्यआरंभ आदेश देण्यात आले होते.

सदरील दोन्ही कामाच्या 9 कोटीच्या कामाच्या निविदा पल्लवी कन्स्ट्रक्शन यांना मंजूर झाल्या होत्या. परंतु नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार ज्ञानेश्वर घोंगडे यांनी 1 नोव्हेंबर रोजी शुद्धी पत्रक काढून तांत्रिक कारण दाखवून दोन्ही निविदा आणि वर्क ऑर्डर रद्द केल्याचे परिपत्रक काढले.या प्रकरणी तहसीलदार गोविंदा येरमे यांनी चर्चेसाठी बोलावले असतात आदेशाचे पालन न करता चर्चेला हजार झाले नाही.या प्रकरणी नायब तहसीलदार तथा नगरपालिका अतिरिक्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर घोंगडे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांना जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी निलंबित केले आहे.
Previous
Next Post »