मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर एसटी कर्मचारी कामावर परत येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनंतर राज्यातील तीन हजार एसटी कर्मचारी कामावर पुन्हा परतले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपा विरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालयात तसेच औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती .या नंतर उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत जाण्याचे आदेश दिले होते परंतु कर्मचाऱ्यांनी संप चालूच ठेवला.त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारने खाजगी प्रवाशी वाहतूकीला परवानगी दिली होती.
एसटी कर्मचारी मागील 7 दिवसापासून संपावर होते. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा पूर्ण पणे ठप्प झाली होती. या दरम्यान प्रवाशांचे मात्र हाल झाले. खाजगी प्रवाशी वाहतूक करणारे जास्तीचे तिकीट भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत होते.शनिवारी तीन हजार कर्मचारी कामावर परतले असून वेगवेगळ्या 20 ठिकाणाहून 71 एसटी बस सोडण्यात आल्या आहेत.71 बस मधून एक हजार नऊशे छत्तीस प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती आहे.एसटी कर्मचारी संप काळात खाजगी प्रवाशी वाहतूकदारांना राज्य सरकारने परवानगी दिली होती .मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनंतर तीन हजार एसटी कर्मचारी कामावर परतल्याने एसटी प्रवाशांची चिंता कमी झाली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon