बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी द्वारा कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात मुख्याधिकारी नगरपरिषद भद्रावती यांना दिले निवेदन
चंद्रपूर : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) च्या वतीने जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद मुख्याधिकारी यांना मंगळवार 19 एप्रिल रोजी कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
घंटा गाडी सफाई कामगारांना 350 रुपये रोजंदारी मिळावी,कामगारांना पी एफ नंबर देण्यात यावा तसेच आठवड्यातून एक पगारी सुट्टी देण्यात यावी.अशा विविध मागण्या घेऊन भद्रावती शहराध्यक्ष विकास दुर्योधन यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद मुख्याधिकारी भद्रावती यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी देखील वरील मागण्याच्या संदर्भात मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले होते.
यावेळी विकास दुर्योधन (शहराध्यक्ष) अजय लिहीतकर (विधानसभा अध्यक्ष), स्वप्नील कोल्हटकर (शहर महासचिव ), दिपक वानखेडे, सुनील रामटेके, अंकुश पोगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon