मृत एसटी चालक दिलीप काकडे यांच्या घरी जाऊन मनसे नेत्यांनी कुटुंबाचे सांत्वन करून आत्महत्या प्रकरणी परिवहन मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन आणि त्यातही तीन तीन महिने वेळेवर पगार मिळत नसल्याने घर चालवण्यासाठी आर्थिक टंचाईला सामोरे जावा लागत आहे. बहुत्यक कर्मचारी हे कर्जबाजारी झाले आहेत. कर्मचाऱ्यांना वेतन वाढ आणि महिन्याला नियमित पगार मिळावा यासाठी एसटी कर्मचारी संघटनानी राज्यव्यापी संप पुकारला होता.संप चालू असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील एसटी चालक दिलीप काकडे यांनी एसटी आगारातच गळफास लावून आत्महत्या केली होती.
मनसे नेत्यांनी मृत एसटी चालक दिलीप काकडे यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिलीप काकडे यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.काकडे यांच्या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून परिवहनमंत्र्यावर 302 चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे आणि राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी शेगाव येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणले की कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली.एसटी कर्मचाऱ्याला राज्य कर्मचारी म्हणून त्यांचा सेवेत समावेश करण्यात यावा आणि राज्यातील एसटी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी म्हटले आहे
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवने,पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ,उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत,रस्ते आस्थापना विभागाचे शेवगाव तालुकाध्यक्ष सागर आधाट, गणेश डोमकावळे, ज्ञानेश्वर कुसळकर,उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बालिया, देविदास हुशार आणि संजय वनवे आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.
ConversionConversion EmoticonEmoticon