भ्रष्टाचारी नेते भाजपात गेले कि निष्कलंक होतात.

ईडी आणि सीबीआयच्या चौकशीतून सुटायचं असेल तर भाजपात प्रवेश करायचा का?
भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांना विचारण्यात आलं होतं कि एकापक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचा अनुभव काय आहे त्यावर हर्षवर्धन पाटील म्हणतात 'मी आता भाजपात आलोय, शांत झोप लागते चौकशी वगैरे काही नाही' हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ज्यांना ईडी सीबीआयच्या चौकशीतून सुटायचं असेल तर भाजपात प्रवेश करावा हेच त्यांच्या वाक्यातून स्पष्ट होते.

 कधीकाळचे काँग्रेसचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झाले होते.ईडी आणि सीबीआयच्या चौकशीतून सुटण्यासाठीच भाजपात प्रवेश केला आहे का असा प्रश्न निर्माण होतो.भाजपा म्हणजे भ्रष्टाचारचं स्वच्छ भारत अभियान आहे आहे का? कोणी किती ही भ्रष्टाचारी नेता असेल आणि त्याने भाजपात प्रवेश केला कि त्याच्यावरील भ्रष्टाचाराचा कलंक धुवून निष्कलंक होतो.

सध्या महाराष्टात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकश्या चालू अहेत.अनेक नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्या जात आहेत. इथे भ्रष्टाचार करणाऱ्याचं कोणी समर्थन करत नाही परंतु केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना याच पक्षातील नेते भ्रष्टाचारी आहेत का? भाजपात एकही असा नेता नाही का जो भ्रष्टाचारी नाही. सर्व धुतल्या तांदळासारखे निष्कलंक आहेत का? तर असं नाही केंद्रातील भाजपा सरकार केवळ सूड बुद्धीने सत्तेचा गैर वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष करत आहे.

आज पर्यंत ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ईडी आणि सिबीआयकडून चौकशीचा ससेमीरा त्यांच्या मागे लावला त्यात एकही भाजपचा नेता नाही. फक्त भाजपच्या विरोधातील पक्षांच्या नेत्यावर आता पर्यंत कार्यवाही केल्या गेल्या आहेत .केंद्रातील मोदी सरकार सत्तेचा गैर वापर करत आहे.विरोधी पक्षातील लोकांवर चौकशीची भीती घालून त्यांच्यावर दबाव तंत्रचा वापर केला जात आहे. भाजपने केलेल्या काळ्या कामाचा कोणी विरोध करू नये. त्यांच्या नेत्यावर कोणी आरोप करू नये म्हणून केंद्रातील भाजपा सरकार ईडी आणि सीबीआय सारख्या संस्थांचा गैर वापर करत विरोधी पक्षाची मुस्कट दाबी करत आहे.

If you want to escape from ED and CBI investigation, why join BJP?

 BJP leader Harshvardhan Patil was asked about his experience of moving from one party to another. Harshvardhan Patil said, "I have joined the BJP now. It was clear from his sentence that he should do it.

 Harshvardhan Patil, a one-time Congress leader, had joined the BJP before the last Assembly elections. No matter how corrupt a leader is and if he joins the BJP, the stigma of corruption is washed away from him.

 At present, several leaders of the Mahavikas Aghadi in Maharashtra are being investigated by the ED and CBI. Many leaders are being accused of corruption. No one supports the corrupt here but only the leaders of Congress, NCP and Shiv Sena are corrupt? Is there no leader in BJP who is not corrupt? Are all washed rice as spotless? It is not like that. The BJP government at the Center is only abusing its power out of revenge and is targeting to the leaders of the Opposition.

 To date, there is not a single BJP leader who has been accused of corruption by the ED and the CBI. Only the leaders of the BJP opposition parties have been prosecuted so far. The Modi government at the Center is abusing its power. No one should oppose the black work done by BJP. The BJP government at the Center is misusing institutions like the ED and the CBI to claim the Muscat of the Opposition so that no one can accuse their leader.
Previous
Next Post »