लखीमपूर खिरी शेतकरी हत्याकांडाच्या निषेदार्थ महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला महाराष्ट्र बंद यशस्वी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चार शेतकऱ्यांना चिरडून हत्या केली होती. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार लोकांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर योगी सरकार कडून कार्यवाही केली जात नाही.भाजपा मंत्र्याचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर उत्तर प्रदेशचं योगी सरकार कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत आहे असा आरोप राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केला आहे.
शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आणि दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी यासाठी काल 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ हा बंद असल्यामुळे राज्यातील व्यापारी,कामगार संघटनानी तसेच भाजप वगळता अनेक राजकीय पक्षांनी महाराष्ट्र बंद ला पाठिंबा दिला होता.
बंद दरम्यान काही ठिकाणी एस टी वर दगड फेक महाराष्ट्र बंद ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असताना काही ठिकाणी एस टी बसेस बर दगड फेक करण्याच्या घटना घडल्या अहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्र बंद ला लोकांनी प्रतिसाद दिला असून बंद यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. एस टी बसेस वर झालेली दगडफेक योग्य नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत असही नवाब मलिक म्हणले.
महाराष्ट्र बंद ला भाजपा चा विरोध
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला राज्यातील भाजपाने विरोध केला होता. जनतेच्या मना विरुद्ध जबरदस्तीने बंद पुकारण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासारकारला विकास विरोधी असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्र बंद दरम्यान जळगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी
जळगाव येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बंद चे आवाहन करत असताना भाजप कार्यकर्ते बंद ला विरोध करत होते. भाजपा कार्यकर्त्यात आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यात वादावादी होऊन या वादावादीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. बंद शांततेत चालू असताना या घटनेमुळे महाराष्ट्र बंद ला गालबोट लागलं.एक दोन किरकोळ घटना वगळता राज्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून बंद यशस्वी पारपडला आहे.
Maharashtra Bandh called by Mahavikas Aghadi government in protest of Lakhimpur Khiri farmer massacre was successful
In Lakhimpur Khiri in Uttar Pradesh, the son of Union Home Minister Ajay Mishra crushed four farmers to death by hitting them with a vehicle. Four more people were killed in the ensuing violence. Ashish Mishra, son of Union Home Minister Ajay Mishra, the main accused in the case, is not being prosecuted by the Yogi government.
The Maharashtra Bandh was called on October 11 to protest the farmers' massacre and take appropriate action against the culprits. As the strike was in protest of the farmers' massacre, traders in the state, trade unions and many political parties except the BJP had supported the Maharashtra strike
Throw stones at buses at some places during Maharashtra Bandh
Maharashtra bandh is getting good response in the state while in some places there have been incidents of ST buses throwing stones. NCP leader and minister Nawab Malik has said that people have responded to the Maharashtra bandh and the bandh has been successful. Nawab Malik has said that the stone pelting on ST buses was not proper. Nawab Malik also said that such incidents should not happen.
BJP opposes Maharashtra bandh
The BJP in the state had opposed the Maharashtra Bandh called by the Mahavikas Aghadi government. It has been forcibly shut down against the will of the people. State Opposition Leader Devendra Fadnavis has said that the state government is anti-development.
Violent clashes in two groups at Jalgaon during Maharashtra Bandh
In Jalgaon, BJP workers were opposing the bandh while Mahavikas Aghadi workers were calling for a bandh. BJP workers and Mahavikas Aghadi workers got into an argument and this argument turned into a fierce fight. While the bandh was going on peacefully, the Maharashtra bandh was disrupted due to this incident. Apart from one or two minor incidents, the bandh has received good response in the state and the bandh has been successful.
ConversionConversion EmoticonEmoticon