PM केअर फंडातील पैसा व्हेंटिलेटर साठी खर्च केला जाणार होता तस झालं का?
माहिती अधिकार कायद्याला 16 वर्ष पूर्ण झालेच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर बोलत असताना माहिती अधिकार कायदा कमकुवत केला जात असल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी PM केअर फंडाचं उदाहरणं देऊन सांगितलं कि PM केअर फंडात जमा झालेला पैसा कुठे जातोय त्याच ऑडिट रिपोर्ट कुठे आहे ? असा प्रश्न उपस्थित केला.28 फेब्रुवारी 2020 ते 31 मार्च 2020 या कालावधीत तीन हजार कोटी रुपये जमा झाल्याचे ऑडिट आहे.परंतु त्यानंतर आज 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत कुठलेच ऑडिट केलेलं नाही.
PM केअर फंडात किती कोटी रुपये जमा झालेत आणि त्याचा उपयोग कशासाठी केला याची अद्याप माहिती देशातील जनतेला नाही.PM केअर फंडाविषयीच्या माहिती अधिकार बाबतीतील याचिका या आधीच PM केअर कडून फेटाळून लावण्यात आली आहे.कोरोना काळात PM केअर फंड चारिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली होती.व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवठा तसेच रुग्णांना सर्वोतोपारी सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून याची स्थापना केली होती.देशातील कर्मचारी तसेच दान कर्त्यांनी PM केअर फंडात पैसा जमा केला होता. या फंडात किती पैसा जमा झाला आणि त्याचा वापर कशासाठी केला हे देशातील जनतेला अजून पर्यंत माहिती नाही.
जनतेने दिलेला पैसा हा सरकारी खजान्यात जमा व्हायला पाहिजे परंतु मोदी सरकार ने स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करून देशातील जनतेचा पैसा वयक्तिक उपयोगसाठी वापर केला आहे. जनतेने कोरोनाच्या नावाखाली दिलेला पैसा मोदी सरकार येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी वापरणार आहे का?.केंदतील मोदी सरकार PM केअर फंडातील जमा पैशाचे ऑडिट का करत नाही.
माझी न्यायाधीशांनी केंद्र सरकारच्या विश्वासहर्तेवर बोट ठेवून जाहीर पणे बोलणे म्हणजे केंद्रातील मोदी सरकार सत्तेचा गैर वापर करत आहे. जिसकी लाठी उसकी भैस अशा पद्धतीने केंद्र सरकार सत्तेचा वापर हवा तसा करून घेत आहे.असचं यातून दिसून येते.प्रधानमंत्री मोदीजी भ्रष्टाचारी नसतील तर त्यांनी PM केअर मध्ये जमा झालेला पैशाचा हिशोब जनते पुढे ठेवावा आणि केंद्रातील भाजपा सरकार PM केअर फंडसंबंधी निष्कलंक आहे हे सिद्ध करून दाखवावे.
ConversionConversion EmoticonEmoticon