गुजरातच्या मोरोबी येथील हलवड मधील मीठ कारखान्याची भिंत कोसळून भीषण अपघात, 12 कामगारांचगा मृत्यू, तर अनेक जन ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
गुजरात : गुजरात मधील मोरबी येथील हलवड जीआयडीसी मध्ये एका मीठ कारखान्याची भिंत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 12 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर ढिगाऱ्याखाली अनेक जन अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.अपघात स्थळी बचाव व मदत कार्य सुरु आहे.बुधवारी गुजरात मधील मोरबी हलवड येथील मिठाच्या कारखान्याची भिंत अचानक कोसळली.भिंत कोसळल्याने कामगारांची जिवीत हानी मोठ्या प्रमाण झाली.या अपघातात 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जन भिंतीखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात स्थळी बचाव कार्य वेगाने सुरु आहे.गुजरातचे कामगार आणि रोजगार मंत्री तसेच स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनी सांगितले की हलवाडच्या औद्योगिक परिसरात समुद्री मीठ कारखान्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.या दुर्घटनेत आता पर्यन्त 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भिंती खाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघात मृत्यू मुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येक कुटुंबाला 4 लाख रुपये मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.तसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोरबीच्या जिल्हाधिकारी यांना तात्काळ आदेश देऊन मदत व बचाव कार्य करण्यास सांगितले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मोरबी येथील अपघातात मृत्यू झालेल्या कामगाराप्रती दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री कार्यालयाने ट्विट करून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी अंतर्गत मृत कामगारांच्या कुटुंबाला प्रत्यक्ती 2 लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले आहे.तर या अपघातात जखमी कामगारांना प्रत्यक्ती 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon