राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी मुंबई बद्दल केलेल्या बदग्रस्त विधानाबाबत दिला माफीनामा

राज्यपालांनी मुंबई बद्दल केलेल्या वादग्रत विधानाबाबत चूक कबूल करत दिला माफीनाना 
मुंबई : दोन दिवसापूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अंधेरीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असताना माझ्याकडून चूक झाली अशी कबुली राज्यपालांनी दिली.गुजराती व राजस्थानी निघून गेले तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे राज्यपालाविरुद्ध सर्वच स्थारातून तीव्र संतापाची लाट निर्माण झाली होती. यावरून माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असं सांगत महाराष्ट्राचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता अशी प्रतिक्रिया दिली होती.

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध करत राज्यपाल हे महाराष्ट्रद्रोही असून त्यांना हटवण्याची मागणी केली जात आहे.शिंदे-फडणवीस सरकारने सुद्धा या विधानाचं समर्थन करत नसल्याचे सांगितले होते.भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी या वादग्रस्त विधानाबाबत राज्यपालांना सुनावले असल्याची चर्चा आहे.त्यामुळेच काल सोमवारी राज्यपालांनी आपली चूक कबूल करत माफीनामा सादर केला आहे.

माफीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्यांची सर्वसमावेशकता व सर्वांचा बरोबर घेऊन चालण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर आहे.जवळ पास गेल्या तीन वर्षात राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे.आपल्यावतीने मी महाराष्ट्र व मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला असल्याचे माफीनाम्यात भगत सिंह यांनी म्हटले आहे.

भाषण करताना माझ्याकडून निर्हेतुक पणे काही चूक झाली असेल तर त्याचूकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अपमान समजला जाईल ही कल्पना मला करवत नाही.महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतः करणाचा पुनरप्रत्यय देईल, असा मला विश्वास आहे.
-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.
Previous
Next Post »