केंद्र सरकार विरुद्ध महाराष्ट्र सरकार संघर्ष शिगेला पेटला :
शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत राजकीय समीकरण जुळवून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण झाला.दोन्ही पक्षामधील पंचवीस वर्षापासूनची युती तुटली. तेंव्हा पासून दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर सतत टोकाचे आरोप-प्रत्यारोप होत राहिले आहेत.मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून असो की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील भाजपाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष करण्यात आले.त्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांपासून विचाराराने कोसो दूर गेले आहेत.
केंद्रातील भाजपा सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. सीबीआय किंवा ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले जात आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते,आमदार, आणि खासदार यांना ईडीच्या चौकशीत जाणूनबुजून आणि राजकीय सूडबुद्धीने अडकीवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.भाजपा सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर ईडीकडून कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुली प्रकरणी ईडी कडून कार्यवाही करण्यात आली आहे.
भरीसभर म्हणून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारकडून केलेली अटकेची कार्यवाही आहे.नारायण राणे यांच्या अटकेचा बदला म्हणून राज्याचे परिवनमंत्री अनिल परब यांना ईडी ची नोटीस देण्यात आली असून चौकशी ला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. लगेच शिवसेना खासदार भावना गवळी यांची मलमत्ता असलेल्या पाच ठिकाणावर ईडीकडून छापे मारण्यात आले आहेत.भाजपचे किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कार्यवाही बाबत कुठलीही पूर्व सूचना देण्यात आलेली नाही. या कार्यवाही सोबतच अनिल परब यांचे परिवहन खात्यातील विश्वासू असलेले अधिकारी यांच्याही घरावर ईडी कडून छापे मरण्यात आले आहेत.
एकापाठोपाठ एक अशी ईडीकडून कार्यवाही केली जात आहे. फक्त महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यावर कार्यवाही केली जात आहे. याचाच अर्थ केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सूडबुद्धीने आणि बदला घेण्याच्या उद्देशाने तर अशा प्रकारच्या कार्यवाह्या करत नाही ना अशी शंका यायला लागली.एकापाठोपाठ एक ईडी द्वारा होणाऱ्या कार्यवाह्यामुळे केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष शिगेला पेटल्याचा पाहायला मिळतो.
The Maharashtra government ignited a struggle against the central government
Since the Shiv Sena came to power in the state under the leadership of Uddhav Thackeray by aligning the political equation with the NCP and the Congress, a rift has developed between the Bharatiya Janata Party and the Shiv Sena. Since then, both the parties have been making sharp allegations against each other. Whether it is the issue of Maratha reservation or the issue of OBC's political reservation, the BJP in the state has been paying constant attention to Chief Minister Uddhav Thackeray.
The BJP government at the Center is not leaving any chance to trap the Mahavikas Aghadi government in Maharashtra. The Mahavikas Aghadi government is being held to account through the CBI or the ED. The leaders, MLAs and MPs of Shiv Sena, NCP and Congress in the Mahavikas Alliance are being deliberately and politically implicated in the ED's probe. After that, action has been taken against former Home Minister Anil Deshmukh in a case of recovery of Rs 100 crore by the ED.
In retaliation, Union Minister Narayan Rane has been arrested by the state government. In retaliation for Narayan Rane's arrest, state Parivan Minister Anil Parab has been issued an ED notice and ordered to appear before the inquiry. Immediately, ED raided five places belonging to Shiv Sena MP Bhavana Gawli. It is said that this action was taken on the complaint of BJP's Kirit Somaiya. It is noteworthy that no prior notice has been given regarding this action. Along with the operation, raids were also carried out on the house of a transport officer loyal to Anil Parab by the ED.
One such ED after another is being prosecuted. Only the party leader in the Mahavikas Aghadi is being prosecuted. This means that there is a suspicion that the BJP government at the Center is not taking such action out of political revenge and revenge.
ConversionConversion EmoticonEmoticon