डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना प्रभाकर पारधे म्हणतात बाबा तुझी लेकरं जमीन कसत नाहीत, म्हणून तर तुझ्या स्वप्नातला भारत दिसत नाही.
औरंगाबाद : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना प्रभाकर पारधे म्हणतात बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांच्या विचारावर चालण्याचा संकल्पना केला पाहिजे तरच त्यांना खरी आदरांजली ठरेलं. ते कवी रचनेतून आपल्या भावना विषद करतात.
बाबा तुझी लेकरे जमीन कसत नाही..!
म्हणून तुझ्या स्वप्नातील भारत दिसत नाही..!!
आज तुला भावनिक भक्त अभिवादन करतील...!
मात्र,उद्या तुझा त्याग आणि समर्पण विसरतील..!!
तत्वज्ञान तुझे आमच्या डोक्यात घुसत नाही...!
म्हणून तुझ्या स्वप्नातला भारत दिसत नाही...!!
बांधवांनो आज आपण पक्का निर्धार करूया..!
आणि बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी सज्ज होऊया..!!
"संघर्ष बा भीमाचा मनी आठवारे..!
अन, मशाली लढ्याच्या पुन्हा पेटवारे..!!
हीच खरी बापा प्रती आदरांजली ठरेल.आपण अजूनही धीर सोडलेला नाही याचा मला गर्व आहे. त्यामुळे मला अशा आहे, डोळ्यासमोर बाबांची दिशा आहे... तेव्हा मला महाकावी वामन दादा कर्डक यांच्या त्या दोन ओळी आठवतात...
बोल उठी हलचल जमाना बदलेगा...!
आज नाही तो कल जमाना बदलेगा..!!
आज नही तो कल जमाना बदलेगा..!!!
बाबा तुला कोटी कोटी वंदन.
जय भीम.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना भावना व्यक्त केल्या आहेत.प्रभाकर पारधे यांच्या फेसबुक वाल वरून.
ConversionConversion EmoticonEmoticon