अभिनेता शाहरुख खान भाजपात गेल्यास ड्रुग्सची साखर होईल ; छगन भुजबलांनी लगावला टोला


राज्यात चर्चेचा विषयी असलेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला टोला लगावला आहे
सद्या राज्यात चर्चेचा विषय म्हणजे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरण आहे. मुंबई तील क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खान याला अटक झाली तेव्हा पासून या ड्रग्स प्रकरणी  राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे. या आधी मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्स प्रकरणी एनसीबी आणि भाजपावर गंभीर आरोप केले असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आर्यन खान प्रकरणी भाजपाला टोला मारला मारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  एका कार्यक्रमात बोलत असताना छगन भुजबळ म्हणले की गुजरातच्या अदानी मुंद्रा बंदरावर तीन हजार किलो ड्रग्स सापडले त्याविषयी कुठलीच चर्चा नाही की चौकशी नाही परंतु अभिनेता शाहरुख खानच्या मुलाने ड्रग्स बाळगल्या प्रकरणी एनसीबी त्याच्या मागे लागली आहे. जर शाहरुख खान भाजपात गेले तर ड्रुग्सचे साखरेत रूपांतर होईल असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला लागवला आहे.

मुंबई क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात 2 ऑक्टोबर रोजी आर्यन खान आणि त्याचे मित्र यांना आमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकारणी,अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी आणि त्याची विक्री केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु आता पर्यंत ते तुरुंगात असून आर्यन खान आणि त्याचे मित्रांना अजून जमीन मिळालेला नाही.

दरम्यान या प्रकरणात आणखी काही नावं समोर यण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान याच्या बँक खात्याची चौकशी करण्यात येत आहे. शिवाय काढून टाकलेले व्हाट्सअप मेसेज देखील तपासण्यात येत आहे.आर्यन खान सह त्याचे मित्रांनी मोठ्याप्रमाणात आमली पदार्थाची विक्री केली आहे का ?हे पाहण्यासाठी आर्यन खान चे बँक खाते देखील तपासण्यात येणार आहेत.या प्रकरणाची अटकेत असलेल्या आर्यन खान च्या जामीनावर 26 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणी एनसीबीकडून आणखी पुरावे गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Previous
Next Post »