मंदिरं उघडण्याची चढाओढ ;शाळा उघडण्यासाठी कुणीच आंदोलन करत नाही

 मंदिरं उघडण्याची सर्वांना घाई पण मुलांच्या शिक्षणाबद्द कोणाला काही वाटत नाही :
कोरोनामुळे सध्या राज्यातील मंदिरं उघडण्याची सरकारने परवानगी दिली नाही.कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून सर्वच धार्मिक स्थळं बंद आहेत. परंतु आता मंदिरं उघडण्यात यावीत यासाठी धार्मिक संस्था आणि राजकीय पक्षाच्या नेत्यामध्ये चढओढ सुरु झाली आहे.सोमवारी भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.मंदिरं उघडली नसल्यामुळे गरीबावर उपासमारीची वेळ आल्याची भाजपाच्या वतीने सांगण्यात आले आहे.मंदिरं उघडण्यात यावेत साठी मनसे सुद्धा पुढाकार घेत आहे.

अण्णा हजारे यांनी आधी मंदिरं उघडा शाळा उघडण्याची गरज नाही अस वक्तव्य केलं आहे. शाळा उघडून शिक्षक कोणता प्रकाश पडणार आहेत असं देखील अण्णा हजारेंनी म्हटलं आहे.फक्त मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्यास तयार आहेत.कोरोनाच्या पार्स्वभूमीवर पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांच्या शाळा बंद आहेत.अण्णा हजारेंना राज्यातील मुलांच्या शैक्षणिक भविष्याबद्दल अजितबात चिंता वाटत नाही.मुलं हे देशाचं भविष्य आहेत.शिक्षणाने समाजाची व देशाची प्रगती होते असे अनेकदा आपण बोलतो.

परंतु अण्णा हजारेसारखे तथाकतीत सुपारी घेऊन आंदोलन करणारे समाज सेवक शाळा उघडण्याची गरज नाही म्हणतात.यावरून ते कोणत्या मानसिकतेचे आहेत हे कळून येते.गेली वर्षभर शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण चालू असले तरी ते परिणाम कारक नाही. ऑनलाईन शिक्षण घेत असताना मोबाईल घेण्यासाठी गरीब पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. मोबाईल घेतला तर महिन्याला अडीचशे रुपयाचे रिचार्ज करावे लागते. त्यात पुन्हा नेटवर्कची अडचण यामुळे मुलांच्या शिक्षणाची परवड होत आहे.

शिक्षणावर भाविपिढीच भविष्य अवलंबून असताना त्याचे कोणालाही काही देणे घेणे नाही. शाळा सुरु व्हाव्यात, मुलांच्या परीक्षा वेळेवर व्हाव्यात यावर कोणी आंदोलन करत नाही. केवळ धार्मिक भावना भडकवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न भाजपा सारखे हिंदुत्ववादी पक्ष आणि अण्णा हजारे सारखे सुपारीघेवून आंदोलन करणारे समाज सेवक प्रयत्न करत आहेत. फक्त मंदिरं उघडण्याची सर्वांना घाई पण मुलांच्या शिक्षबद्दल कोणाला काही वाटत नाही?.

Everyone is in a hurry to open temples but no one cares about children's education:

 The government has not allowed the opening of temples in the state due to corona. All religious places are closed to prevent the spread of corona infection.  But now there is a tussle between religious organizations and political party leaders for the opening of temples. On Monday, the BJP's spiritual front staged an agitation to open the temples.
MNS is also taking initiative to open temples.

 Anna Hazare has earlier said that there is no need to open temples and schools.  Anna Hazare has also said what kind of light will be shed by the teachers after opening the schools. They are only ready to agitate for the opening of the temples.  We often say that education leads to progress of society and country.

But so-called social activists like Anna Hazare, who are agitating with betel nuts, say there is no need to open a school.  While online learning is ongoing, it is not a result factor.  Poor parents have to face financial difficulties to get a mobile while studying online.  If you buy a mobile, you have to recharge Rs. 250 per month.  Again, the problem of networking is making children's education affordable.

While the future depends on education, it does not owe anything to anyone.  No one is agitating for school to start, for children's exams to be held on time.  Pro-Hindu parties like BJP and social activists like Anna Hazare are trying to burn political nest only by inciting religious sentiments.  Everyone is in a hurry to open temples but no one cares about children's education.

Previous
Next Post »