केंद्रातील मोदी सरकार ईडीचा गैरवापर करते का?
देशात अनेक केंद्रीय संस्था आहेत त्यापैकी सीबीआय कॅग ,आणि ईडी या संस्था केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करतात. त्यातील सीबीआय ही संस्था गुन्हेगारी घटनाचा तपास करणारी यंत्रणा आहे, कॅग ही संस्था किंवा सरकारी वित्तीय लेखापरीक्षण करणारी यंत्रणा आहे तर ईडी ही महसूल विभागाशी संबंधित तपास यंत्रणा आहे. एखाद्या व्यक्तीकडे, किंवा संस्था, कंपनी यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त धनसंपत्ती असेल तर अशा व्यक्ती वर किंवा संस्था किंवा कंपनी वर ईडीकडून चौकशी केली जाते.
जेव्हा पासून केंद्रात भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीजी च्या नेतृत्वात सरकार असतीत्वात आले आहे तेव्हा पासून विरोधी पक्षाचे नेते, आमदार,खासदार किंवा मंत्री यांच्यावर ईडी द्वारा चौकशी करण्यात येत आहे. खरोखर एखाद्या व्यक्तीकडे उत्पन्नापेक्षा जास्त धनसंपत्ती असेल तर त्यावर चौकशी किंवा कार्यवाही करण्याचा ईडीला अधिकार आहे.त्यात गैर काहीच नाही.परंतु राजकीय द्वेष मनात ठेवून जाणूनबुजून सूडबुद्धीने एखाद्यावर कार्यवाही करणे म्हणजे सत्तेचा आणि यंत्रनेचा गैरवापर करणे होय.
मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात फक्त विरोधी पक्षाचे नेते आमदार खासदार किंवा मंत्र्यावर सीबीआय किंवा ईडीची कार्यवाही केली जात आहे.भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे सहयोगी पक्षात असा कोणीच नेता, आमदार,खासदार किंवा मंत्री नाही का ज्याच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त धनसंपत्ती नाही. सर्व भ्रष्टाचारी नेते मंडळी भाजपात येऊन शुद्ध झालेत. काही नेते तर भाजपाकडून होणाऱ्या कार्यवाहीच्या भीतीने भाजपाच्या पदराखाली येऊन बसले आहेत.भारतीय जनता पार्टी ही गुंड, गुन्हेगार,बलात्कारी आणि भ्रष्टाचारी लोकांचं शुद्धीकरण करणारी मशीन आहे.कोणीही यायचं आणि पवित्र व्हायचं.
आज हा लेख लिहिण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली असून ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.काल परवा भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने अटक केली होती.या अटकेच्या कार्यवाही बाबतीत अनिल परब यांचा हात असल्याचे नारायण राणे यांच्याकडून सांगितले जात आहे.
नारायण राणेना झालेल्या अटकेचा बदला म्हणून अनिल परब यांच्यावर ईडीकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
या आधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच भाजपातून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यावर सुद्धा ईडी कडून कार्यवाही करण्यात आली आहे.भाजपा विरोधी पक्षाच्या नेत्यावर आतापर्यंत अनेक राज्यात सीबीआय व ईडी कडून कार्यवाह्या करण्यात आल्या आहेत.आश्चर्याची बाब म्हणजे मोदी सरकारच्या कार्यकाळात आता पर्यंत एकाही भाजपा नेत्यावर ईडी ची कार्यवाही झालेली नाही.यावरून स्पष्ट होतो की केंद्रातील मोदी सरकार सूडबुद्धीने ईडीचा गैर वापर करत आहे.
Is the Modi government at the center abusing the ED?
There are several central bodies in the country, including the CBI, CAG, and the ED, which operate under the control of the central government. The CBI is the body that investigates criminal cases, the CAG is the body that conducts financial audits, and the ED is the body that investigates the revenue department. If a person, or organization, company has more assets than their income, such person or organization or company is investigated by the ED.
Opposition leaders, MLAs, MPs or ministers have been under investigation by the ED since the Bharatiya Janata Party (BJP) government led by Narendra Modiji came to power at the Center. The ED has the right to investigate or prosecute a person if he or she has more wealth than income. But there is nothing wrong with that.During the tenure of the Modi government so far, only the Leader of the Opposition, MLA, MP or Minister is being prosecuted by the CBI or the ED.
Is there no leader, MLA, MP or minister in the Bharatiya Janata Party or its allies who does not have more wealth than income? All corrupt leaders have come to BJP and become pure. Some leaders have come under the BJP's banner for fear of action from the BJP. The Bharatiya Janata Party is a machine to purify goons, criminals, rapists and corrupt people.
The reason for writing this article today is that Maharashtra Transport Minister and Shiv Sena leader Anil Parab has been issued a notice by the ED and has been ordered to appear before the ED for questioning. It is being said by Narayan Rane that Anil Parab has a hand.
The ED has taken action against Anil Parab in retaliation for the arrest of Narayan Rane.
Earlier, former Home Minister Anil Deshmukh and Eknath Khadse, who joined NCP from BJP, have also been prosecuted by the ED. The ED has not taken any action. It is clear from this that the Modi government at the Center is misusing the ED out of revenge.
ConversionConversion EmoticonEmoticon