परभणीत वैद्यकीय महाविद्यालय स्थापने संबंधी सर्व पक्षीय आंदोलन:
परभणीत वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले पाहिजे यासाठी परभणीकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मागील काळात अनेक प्रयत्न नागरिक व राजकीय नेत्यांच्या वतीने करण्यात आले होते. वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग सुद्धा आला होता.शासन स्तरावर वैद्यकीय महाविद्यालय स्थापने संबंधी लागणाऱ्या जागेसाठी पाहणी देखील करण्यात आली होती. परंतु जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणी बाबतीत बोलली जाते. राजकीय श्रेयवादच्या लढाईत वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला.
आता वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या मागणीने जोर धरला असून सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येत आहे.परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी अति महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.अपघात झालेले रुग्ण किंवा एखाद्या आजारावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपकरणे किंवा इतर पुरेशा सोयी सुविधा नसल्यामुळे नांदेड किंवा औरंगाबाद अशा ठिकाणी रुग्णांना न्यावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब नागरिकांना अनेक वर्षांपासून अडचणीचा सामना करावा लागत आहे.
वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाल्यास जिल्यातील नागरिकांची आरोग्यासंबंधित असलेली अडचण दूर होऊन आर्थिक नुकसान कमी होईल.एकूणच परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बाब असेल आणि परभणी जिल्ह्याचा दर्जा सुद्धा वाढेल. या अति जिव्हाळ्याच्या प्रश्नासंबंधी सर्व पक्षीय तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.
वैद्यकीय महाविद्यालय स्थापने संबंधी खासदार आमदारांचं आंदोलन आणि उपोषण कोणाच्या विरोधात?
जनतेच्या हितासाठी लोक कल्याणासाठी आंदोलन उपोषण करून शासन दरबारी आपली मागणी लावून धरणे त्याचा पाठपुरावा करून मागणी पदरात पडून घेणे हा यामागचा हेतू असतो. परंतु सध्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आहे.सरकारची स्टेअरिंग शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.
परभणीचे खासदार शिवसेनेचे आणि परभणी विधानसभेचे आमदार शिवसेनेचे असताना वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी या लोक प्रतिनिधीना आंदोलन उपोषण करण्याची वेळ येते. याचा अर्थ काय समजावा. सरकार तुमचेच आणि तुम्हाला तुमच्याच सरकारच्या विरोधात आंदोलन उपोषण करावं लागतंय ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी कुठलीच अडचण यायला नाही पाहिजे.एक तर सरकार कुठे तरी कमी पडते किंवा सरकारची मानसिकता नकारार्थी असावी किंवा परभणीच्या लोकप्रतिनिधिंना सरकार भाव देत नसावे. दुसरा अर्थ असाही निघतो की या आंदोलनाच्या माध्यमातून लोक प्रतिनिधीद्वारा जनतेचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला जात असावा.अन्यथा आपल्याच पक्षाच्या सरकार विरोधात कोण आंदोलन उपोषण करणार बर?
All party agitation regarding establishment of medical college in Parbhani:
Parbhanikars have been demanding for many years that a medical college should be established in Parbhani. In the past, many efforts were made for this by the citizens and political leaders. The process of setting up a medical college was also expedited. But in the world Germany and in India the saying Parbhani is spoken in the case of Parbhani. In the battle of political credit, the proposal for a medical college went cold.
Now the demand for the establishment of a medical college has been emphasized and an all-out agitation is taking place. This is a very important and intimate issue for the citizens of Parbhani district. Therefore, the poor citizens of the district have been facing difficulties for many years.
If a medical college is established, the health related problems of the citizens of the district will be removed and the financial loss will be reduced. The agitation is being carried out on behalf of all parties as well as various social, educational and religious organizations on this very intimate issue.
Against whom is the agitation and hunger strike of MPs regarding establishment of medical colleges?
The purpose of this is to hold a movement for the welfare of the people by holding a fast for the welfare of the people. But at present, there is a three-party government of Shiv Sena NCP and Congress in the state. The steering wheel of the government is in the hands of Shiv Sena chief Uddhav Thackeray.
When the MPs of Parbhani are Shiv Sena and the MLAs of Parbhani Assembly are Shiv Sena, it is time for these people's representatives to go on a hunger strike for the establishment of a medical college. What does this mean? It is a great shame that the government is yours and you have to go on a hunger strike against your own government. With a three-party government, there should be no problem in setting up a medical college. Another implication is that through this movement, the people's representatives must be trying to get the support of the people. Otherwise, who will go on a hunger strike against the government of their own party?
ConversionConversion EmoticonEmoticon