राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल यावरून चंद्रकांत पटलांना शरद पवारांचं उत्तर
महाराष्ट्र राज्याच सरकार स्थिर ठेवण्यात व राज्यकारभार व्यवस्थित हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सहकारी यशस्वी झाले असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार असं म्हणणाऱ्या भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाठलांना टोला लगावला आहे. शरद पवार म्हणतात चंद्रकांत पाठलांना नविन वर्षात माझ्या शुभेच्छा.सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या नविन इमारतीच्या उदघाटनासाठी खा.शरद पवार आले होते.
खा.शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देखील आहेत.यावेळी खा. श्रीनिवास पाटील देखील उपस्थित होते.महाविद्यालच्या इमारतीच्या उदघाट्न कार्यक्रमानंतर खा. शरद पवार हे मध्यमाशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता असलेच्या प्रश्नावर पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता नविन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.
राज्याच्या विधिमंडळात उद्धव ठाकरे सरकार कडे पूर्ण बहुमत असून राज्य सरकार स्थिर ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी यशस्वी ठरले आहेत. जे लोक अस्वस्थ आहेत तेच लोकं अशा प्रकारची विधानं करीत आहेत.असा खोचक टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाठलांना लगावला आहे. चंद्रकांत पाठलांनी या आधी सुद्धा अशा प्रकारची विधानं केली आहेत. परंतु सामान्य लोक त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नाहीत.त्यांच्या बोलण्याचा काहीही फायदा होणार नाही.त्यामुळे मी ही त्याबाबत जास्त बोलू ईच्छित नाही.असं म्हणून त्यांना जास्त महत्व देण्यास पवार यांनी नकार दिला.
महाविकास आघाडी सरकार मध्ये विधानसभा अध्यक्ष नाही.अध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दोन वेळा तारखा दिल्या होत्या परंतु विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली नाही हा राज्यपाल तसेच घटनेचा अवमान आहे असं म्हणत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
ConversionConversion EmoticonEmoticon