भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ असं संविधान आहे. जगातील सर्व देशांच्या संविधानाचा अभ्यास करून पारखून भारतीय संविधान लिहिलं आहे. या देशातील सर्व समाज घटकांचा विचार करून त्यांना सामाजिक संरक्षण देण्यात आले आहे. शेतकरी, मजदूर, नौकरदार व्यापारी, महिला आणि विद्यार्थी या घटकांचे हित व संरक्षण अंतर्भूत आहे. कुठल्याही समाज घटकावर अन्याय अत्याचार होणार नाही सर्वाना समान संधी चा अधिकार असेल देशातील कुठल्याही समाज घटकातील व्यक्ती आपल्या न्याय अधिकारापासून वंचित राहणार नाही याचा अंतर्भाव संविधानात करण्यात आला आहे. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11महिने 18 दिवसाचा कालावधी लागला यासाठी एकट्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस मेहनत करून 26 नव्हेंबर 1949 संविधान सभेस सुपूर्द केलं. म्हणूनच तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारती घटनेचे शिल्पकार म्हणतात. एवढ्या कष्टाने बाबासाहेबानी संविधान लिहिलं परंतु ते असं म्हणतात मी लिहिलेलं संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला चालवणारे लोकं चांगले नसतील तर याचा काहीही उपयोग होणार नाही. हे बाबासाहेबांचं वाक्य आज लागू होताना दिसत आहे. 2002 मधे देशाच्या सर्वोच्च्य न्यायालायने नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडीला तिरस्काराचे चेहरे आणि मानवतेला घातक असल्याचे सांगितले होते. तेच दोन चेहरे आज देशाच्या केंद्रस्थानी आहेत... तर देशाची परिस्थिती काय होईल याची आपण कल्पना करू शकता. रेल्वे, LIC, एअरपोर्ट विकून टाकले. शेतकरी विरोधात कायदे करून अंबानी अदानी सारख्या व्यक्तींना फायदा पोहचविला जात आहे. म्हणून तर भारती संविधानाचा वापर राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे हे स्पष्ट होते.
English translation :
The Indian Constitution is the best constitution in the world. The Constitution of India has been written after studying the constitutions of all the countries of the world. They have been given social protection considering all the social elements in this country. The interests and protection of farmers, laborers, employed traders, women and students are included. No injustice will be inflicted on any section of the society. Everyone has the right to equal opportunity. It took 2 years 11 months and 18 days to write the constitution. Dr. Babasaheb Ambedkar alone worked day and night and submitted it to the Constituent Assembly on 26 November 1949. That is why Dr. Babasaheb Ambedkar is called the sculptor of the Bharati Constitution. Babasahebani wrote the constitution with such difficulty, but he says that no matter how good the constitution I have written, it will be of no use if the people who run it are not good. This statement of Babasaheb seems to be applicable today. In 2002, the country's Supreme Court had declared Narendra Modi and Amit Shah to be hateful and dangerous to humanity. The same two faces are at the center of the country today ... so you can imagine what will happen to the country. Railways, LIC, airport sold. Legislation against farmers is benefiting people like Ambani Adani. So it is clear that the use of the Indian Constitution depends on the mentality of the rulers.
ConversionConversion EmoticonEmoticon