Rajyasabha election : रणधुमाळी राज्य सभा निवडणुकीची ; मविआ'चे नेते फडणवीसांच्या दारी

राज्यसभेची निवडणूक बिनविरुद्ध करण्यासाठी छगन भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली मविआ'चे शिष्टमंडळ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले 
मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीची रण धुमाळी सुरु आहे. महाराष्टात राज्य सभेच्या सहा जागा आहेत.राज्यसभेवर आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून जावा यासाठी भाजपा आणि मविआ तर्फे प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे एरवी भाजपा आणि महाविकास आघाडी सरकार मधील सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष विळ्या भोपळ्याचे वैर असल्यासारखे त्यांनी एकमेकांविरुद्ध केलेल्या टिकेतून, बोलण्यातून दिसून येत असल्याचे आपण नेहमीच पहात आहोत.

सत्ता संपादणासाठी मात्र हे राजकीय पक्ष विरोधी पक्षाच्या गळ्याला गळा लावण्यास ही अजिबात मागे पुढे पहात नाहीत. असचं काही आज घडलं आहे. महाविकास आघाडी मधील काही नेते मंडळी, शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते मंडळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्या नेतृत्वाखाली थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहचले. राज्यसभेसाठी तुम्ही आम्हाला मदत करा, विधानपरिषदेसाठी आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारची राजकीय स्वार्थासाठी  सत्ताधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यामध्ये मांडवली होत असताना दिसत आहे.

एकीकडे काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना कोणत्याही परिस्थितीत राज्यसभेसाठी निवडून आणण्यासाठी काँग्रेस हाईकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना सूचना केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने सहाव्या जागेसाठी महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने राज्यबाहेरील उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीतील आमदारांची मत फुटण्याची शक्यता असल्याने काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना धोका निर्माण होऊ शातो. त्यामुळे शिवसेनेने सहावा उमेदवार वापास घ्यावा असा काँग्रेस कडून दबाव टाकला जात आहे.

काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही आला तर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याची भीती आहे. जागा सहा असताना शिवसेनेचा सातवा उमेदवार उभा असल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. भाजपाने 3 उमेदवार दिले आहेत. निवडणूक बिनविरुद्ध करायची असेल तर शिवसेने दिलेला सातवा उमेदवार संजय पवार यांना माघार घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता टिकवायची की राज्यसभेचा सहावा उमेदवार निवडून आणायचा असा पेच सध्या शिवसेने समोर निर्माण झाला आहे. त्यासाठीच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली जात आहे.मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेला प्रस्ताव भाजपाने स्पष्ट पणे फेटाळला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका अपक्ष आमदारांना 6 जूनला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले आहे.राजकीय स्वार्थासाठी काही पण होऊ शकते एवढं मात्र नक्की.
                                                
                                                संपादकीय...

Previous
Next Post »