राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला निवडणुकीत साथ देणाऱ्या घटक पक्षांचा पडला विसर
आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी पुण्यात सांगितले आहे. त्या साठी तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यात आपापसात चर्चा करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी दिल्या आहेत.मात्र 2019 च्या विधानसभा निवडणूकी पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर 11 पक्षांची आघाडी झाली. राज्यात भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सह इतर 11 समविचारी पक्षांची आघाडी झाली होती. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डॉ सुरेश माने यांची बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व अन्य लहान लहान पक्षांचा समावेश होता.विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात विचित्र अशा राजकीय घडामोडी घडल्या आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रूपाने महाविकास आधाडी सरकार अस्तित्वात आले. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना सत्तेचा वाटा मिळाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत आघाडी केलेल्या इतर 11 घटक पक्षांना मात्र सत्तेपासून व राज्याच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवल्या गेलं.
सत्ता मिळाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता इतर घटक पक्षांचा विसर पडला आहे. त्यांची आता गरज राहिली नाही असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी आघाडीतून बाहेर पडल्याची जाहीर पणे सांगितले आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या घटक पक्षांनानाच संपविण्याचा महाविकास आघाडीतील या तीन पक्षांचा डाव असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच की काय या लहान सहान पक्षांना कुठल्याच चर्चेला किंवा बैठकीला बोलावले जात नाही. आपल्यकडे एक जुनी म्हण आहे काम सरो आणि वैद्य मरो ही म्हण पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागू पडते.
सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या नशेत बेधुंद झाली असल्याने त्यांना निवडणुकीत साथ देणारे घटक पक्ष दिसत नाहीत. त्यांची आठवण सुद्धा येत नाही.लहान पक्षांच्या मदतीने सत्ता मिळावायची आणि नंतर त्यांनाच बेदखल करायचं यालाच म्हणतात राजकारण.
संपादकीय...
ConversionConversion EmoticonEmoticon