देशात 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर ; 7 टप्प्यात होणार मतदान


केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा व निवणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 5 राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून आचार संहिता लागू केली.
नवी दिल्ली : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा व निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संयुक्त रित्या शनिवारी 8 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार अहेत. या निवडणुकांची मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार.

 उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी 7 मार्च दरम्यान 7 टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे,तर पंजाब गोवा आणि उत्तराखंड या तीन राज्यात 14 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी मतदान होणार आहे.तसेच मणिपूर मध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होणार आहे.या पाचही राज्यांचा निवडणूक निकाल एकाच दिवशी 10 मार्च रोजी लागणार. उत्तर प्रदेशच्या 403 जागा,पंजाब 117,उत्तराखंड 70, मणिपूर 60,  आणि गोवा 40 जागेवर निवडणूक पार पडली जाणार आहे.
मात्र देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना आणि ओमायक्रोनच्या रुग्ण संख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.त्यापार्शवभूमीवर निवडणुकीत प्रचार करताना जाहीर सभा, रॅलीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.निवडणुकीत उतरलेल्या पक्ष आणि उमेदवारांना आता प्रत्येक घरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे.

निवडणुकीत सार्वजनिक प्रचार सभा आणि प्रचार रॅलीवर बंदी असल्याने प्रचाराचा खर्च मात्र कमी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा देखील घालून दिली आहे. परंतु 'डोअर टू डोअर' प्रचार करावा लागणार असल्याने उमेदवारांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे.कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यामुळे मतदान केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्राची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.

Previous
Next Post »