श्रीनगर : जम्मू काश्मीर मध्ये नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात 6 वेळा चकमक झाली.या चकमकीत भारतीय जवानांनी 9 पाकिस्तानी आतंकवाद्याना ठार केलं आहे.नविन वर्षाच्या सुरवातीलाच भारतीय जवानांनी आतंकवाद्यांचा खात्मा केला असून त्यात पाकिस्तानी प्रमुख लष्कर कमांडरसह चार पाकिस्तानी देखील मारले गेले.मागील वर्षी 2021 मध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू काश्मीर मध्ये 182 आतंकवादी ठार केले होते. त्यापैकी 168 जन काश्मीरचेच असल्याचे स्पष्ट झाले होते.
भारतीय जवानांनी 1 जानेवारीला बॉर्डर ऍक्शन टीमच्या घुसखोरास ठार केलं.पाकिस्तानी नागरिक असलेला मुहम्मद शब्बीर मलिक हा कुपवाडच्या केरन भागात लष्कर कमांडर म्हणून कार्यरत होता.3 जानेवारी रोजी श्रीनगर बाहेरील शालिमार आणि गुस या ठिकाणी एका तासात दोन चकमकी झाल्या.त्यात सुरक्षा जवानांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं.4 जानेवारी रोजी सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत कुलगाम जिल्ह्यातील ओके गावात दोन स्थानिक अतिरेकी ठार झाले.
पाचवी चकमक कुलवामा जिल्ह्यातील चांदगाम याठिकाणी झाली. त्यामध्ये पाकिस्तानातील जैसचा एक आणि इतर दोन अतिरेकी मारले गेले.त्यानंतर 6 जानेवारी रोजी मध्य काश्मीरच्या जोलवा क्रालपुरा बडगाम मध्ये घेरा व शोध मोहिमे दरम्यान संध्याकाळी सहवाजता चकमक झाली. त्यामध्ये 3 दहशदवादी ठार झाले असून शोध कार्य पुढे चालू आहे. अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक सिंग यांनी दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon