ठाकरे विरुद्ध शिंदे वाद आणखी चिघळला : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाविरोधात उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

शिंदे गटाने केलेल्या मागणीवर निवडणूक आयोगाने सुरु केलेल्या कार्यवाही विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली दाखल 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फुटीर बंडखोर गटाने शिवसेनेवर आपला दावा सांगत निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.शिंदे गटाच्या दाव्या नंतर निवडणूक आयोगाने कार्यवाही करत शिवसेने च्या दोन्ही गटाला आपापली कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.परंतु शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं पाऊल उचलत शिंदे गटाने केलेल्या मागणीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या मागणी वरून निवडणूक आयोगाने तात्काळ सुरु केलेल्या कार्यवाही ला स्थगिती देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आणखी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकारणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना निवडणूक आयोग अशा प्रकारे कार्यवाही करू शकत नाही. असा युक्तिवाद करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
Previous
Next Post »