परभणी : आरटीआय अंतर्गत गरीब मुलांसाठी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी 25 टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. मात्र या राखीव जागेतून प्रवेश घेण्यासाठी पालकांची उदासीनता दिसून येत आहे. दर्जेदार शाळांनी यामध्ये सहभाग घेतला नसल्याने राखीव जागेवरील प्रवेशाकाडे पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.
इंग्रजी व सेमी इंग्रजी खाजगी शाळा मध्ये गरीब मुलांना देखील शिक्षण घेता यावे यासाठी शिक्षणाचा अधिकारी (आरटीइ ) अंतर्गत राज्यसरकारने खाजगी इंग्रजी शाळा मध्ये 25 टक्के राखीव जागा ठेवण्याचा नियम केला आहे. गरीब मुलांना इंग्रजी शाळामध्ये शिक्षण घेता यावे हा सरकारचा उद्देश आहे. मात्र दर्जेदार इंग्रजी शाळांनी या प्रक्रियेमध्ये सहभागचं घेतला नाही. त्यामुळे दर्जेदार व गुणवता नसलेल्या शाळेत पाल्यांना प्रवेश देण्याकरिता पालकांनी पाठ फिरवली आहे.
परभणी जिल्ह्यात आर टी आय अंतर्गत गरीब मुलांना खाजगी इंग्रजी शाळात प्रवेशासाठी 1067 जागा राखीव आहेत. मात्र जिल्ह्यात केवळ 623 जागेसाठी प्रवेश अर्ज आले आहेत. राखीव जागेचा कोटा पण पूर्ण होत नाही. ही एका परभणी जिल्ह्याची अवस्था आहे.राज्यातील इतर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. यावरून असे दिसून येते की इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा गरीब मुलांना शिक्षण देण्यास उत्सुक नाहीत.
राज्यसरकारने आर टी इ अंतर्गत गरीब मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळण्यासाठी सोय केली आहे.मात्र यामध्ये दर्जेदार आणि गुणवत्ता असलेल्या खाजगी इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने राज्यातील सर्वच खाजगी शाळांना यामध्ये सहभागी होण्याची सक्ती करावी. तरच आर टी आय अंतर्गत राखीव जागेवर आपल्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी पालक पुढाकार घेतील. तेंव्हाच या योजनेचा गरीब मुलांना फायदा होईल आणि ही योजना सफल होईल.
ConversionConversion EmoticonEmoticon