मुंबई पोलिसांनी बीकेसी आणि वाशी नाका परिसरातून 3 आफ्रिकन नागरिकांना अटक करून 3 कोटी 18 लाख रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले.
मुंबई : मुंबईत 31 डिसेंबरच्या निमित्ताने पार्ट्यासाठी ड्रग्स माफिया कडून आणण्यात आलेला आमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत 3 कोटी 18 लाख रुपये एवढी आहे.या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने ही कार्यवाही केली असून तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.मुंबई क्राईम ब्रँचचे जॉईंट सीपी (joint CP) मिलिंद भारंबे व आमली पदार्थ विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कार्यवाही केली आहे.मुंबईतील बीकेसी भागात एक आफ्रिकन नागरिक संशयित रित्या फिरत असताना आमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना दिसून आला असता त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.त्यानंतर त्याची झडती घेतली असता 105 ग्राम कोकेन आणि 120 ग्राम मोफेड्रीन ड्रग्स (mofedrin drugs) सापडले आहे.ज्या आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याचे नाव इबे माईक असे आहे.पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने दुसऱ्या 2 साथीदारांची नावे सांगितली आहेत.त्याच्याकडे सापडलेलं ड्रग्स त्याच्या 2 मित्रांनी त्याला विकले असल्याचे त्याने सांगिले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वाशी नाका येथे जाऊन त्या ठिकाणी असलेल्या आणखी दोन आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतलं.या दोघांची ओडिफे आणि मंडे अशी नावं असून त्यांची झडती घेतली असता आणखी ड्रग्स सापडले आहे.या तिघांकडे एकूण 225 ग्राम कोकेन, 1500 ग्राम मोफेड्रीन आणि 235 ग्राम एमडीएमए सापडलं आहे.या ड्रग्सची एकूण किंमत 3 कोटी 18 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon