बीड :अंबाजोगाईत महागाईच्या विरोधात बीआरएसपीचे तीव्र निदर्शने आंदोलन


अंबाजोगाईत महागाईच्या विरोधात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बीआरएसपीचे तीव्र निदर्शने आंदोलन 
बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्यावतीने पेट्रोल-डिझेल, एलपीजी- सीएनजी गॅस व खाद्य तेलाच्या भरमसाठ दरवाढीविरोधात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.

राज्यात पेट्रोल-डिझेल, एलपीजी- सीएनजी गॅस व खाद्य तेलाच्या आकाशाला भिडणाऱ्या किंमती मुळे राज्यातील नागरिकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार तसेच केंद्रातील भाजपा सरकाने महागाई दर कमी करून सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भार कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.

 या मागणीसाठी तसेच केंद्र व राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पकक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई युनिट द्वारा ऍड. माणिक आदमाने यांच्या नेतृत्वाखाली दि 8 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
 यावेळी शरद ओव्हाळ, ऍड. सारंग मुंडे,ऍड वसंत हजारे,ऍड छाया देहरे,मधुकर कणसे,महेश जोगदंड,सुभम गवळी,प्रकाश शिंदे,अमोल आदमने,समाधान सारुक,सतीश आदमने,श्रीकृष्ण आदमने,अजय आदमाने,रोहित बनसोडे,वैभव लाखे,अजय कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous
Next Post »