( बेळगाव : शिवप्रेमिंचा रस्तो रोको )
अज्ञात माथेफेरूने बेंगळूरू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने बेळगावत तणावाचे वातावरण, संभाजी चौकात शिवप्रेमीनी वाहतूक अडवली.
बेळगाव : बंगरुळू येथे रात्री अज्ञात माथेफेरूने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळल्याची विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेचे बेळगावात तीव्र प्रसाद उमटले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवप्रेमिंनी ठीक ठिकाणी दगडफेक केली आहे धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक केली असून रस्ते वाहतूक बंद केली आहे.या घटनेने बेळगावात आज शनिवारी तणावाचे वातावरण दिसून येणार असल्याचे पहायला मिळणार आहे.
सकाळी 10 वाजता शिवप्रेमी धर्मवीर संभाजी चौकात जमा होऊन शिवाजी उद्यानापासून मोर्चा निघणार आहे.घटनेचा तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून दोषींवर तात्काळ कार्यवाही करून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.या मोर्चाला जास्तीत संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवप्रेमिंनी केलं आहे.
मागील अनेक महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात येत असल्याच्या घटना राज्यात घडत आहे.तसेच महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे प्रकार देखील सातत्याने वाढत आहेत.गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनगुत्ती येथे उभारण्यात आला असताना रात्रीच्या अंधारात काढून टाकण्यात आला होता.तेव्हा पासून कन्नड भाषिक आणि मराठी भाषिक यांच्यात नेहमीच वाद निर्माण होत आहेत.गुरुवारी रात्री सदाशिव नगर बंगरुळू येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकून विटंबना केल्याची घटना समोर आली.या घटनेमुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon