बीड जिल्हातील खासगी वसतिगृह चालक तरुणाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली
बीड : तालुक्यातील ढोकणमोहा येथील एका 32 वर्षीय वसतिगृह चालकाने 'शेवटी नाविलाज... या उद्या थापडे वस्तीवर ' असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्येची घटना 16 डिसेंबर रोजी बीड तालुक्यातील ढोकणमोहा येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.गोविंदा शहादेव थापडे (वय 32 रा.थापडे वस्ती ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.वडील शहादेव हे होमगार्ड मध्ये कार्यरत असून गोविंद हा वाडवणी येथे खासगी वसतिगृह चालवीत असे.
परंतु कोरोनामुळे मागील पाऊणे दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने वसतिगृह बंद पडले होते.उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने गोविंदला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने नैराश्यपोटी त्यानी गुरुवारी 16 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता 'शेवटी नाविलाज 'असे व्हाट्सअप्प ला स्टेटस ठेवले.मग थोड्यावेळाने सरण जळत असणारे स्टेटस ठेवले. त्यानंतर शेवटी 'या उद्या थापडे वस्तीवर' असे व्हाट्सअप्प स्टेटस ठेवून त्याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. परंतु गोविंद याच्या आत्महत्येच नेमकं कारण काय आहे अजून स्पष्ट झालं नाही. त्यामुळे पुढील तपास चालू असल्याचे सहाय्य्क निरीक्षक बाळासाहेब आघाव यांनी सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon