महाविकास आघाडी सरकारची आज भोंग्या संदर्भात सर्व पक्षीय बैठक


भोंग्याच्या प्रश्नावरून ठाकरे सरकाने बोलावली सर्व पक्षीय बैठक, राज ठाकरे राहणार गैर हजर 
मुंबई : राज्यात भोंग्यावरून राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. अशातच आज ठाकरे सरकारने या संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार हे य बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
राज्य सरकारने ध्वनीक्षेपकाबाबतीत यापूर्वीच काही नियम केलेले आहेत.मात्र हा वाद अजून मिटलेला नाही. त्यासाठी राज्य सरकारने आज या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावली  आहे.

 मस्जितीवरील भोंगे काढण्याच्या बाबतीत राज ठाकरे यांनी सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.मस्जितीवरील भोंगे काढले नाही तर मस्जिती समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.याप्रश्नावर चर्चा करण्यासाठी ठाकरे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  या बैठकीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  हजर राहणार आहेत. मात्र, राज ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले असून, मनसे कडून बाळानांदगावकर व संदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

सर्व पक्षीय बैठक पार पडल्यानंतर बैठकीत काय निर्णय झाला याबाबतची माहित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रसार माध्यमांना देणार आहेत.
Previous
Next Post »