अमरावती व मालेगावातील हिंसाचारात पर्वनियोजित कट असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही
त्रिपुरातील मुस्लीम समाजावर अन्याय होत असल्याच्या पार्शवभूमीवर महाराष्टात अमरावती नांदेड आणि मालेगावात हिंसक घटना घडल्या होत्या .परंतु आंदोलना दरम्यान घडलेल्या हिंसक घटना या पूर्वनियोजित होत्या असा कोणताही पुरावा अद्याप पोलिसांना मिळाला नाही असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.त्रिपुरातील घटनेच्या निषेदार्थ मुस्लीम समाजाने एकत्र येऊन महाराष्ट्रात 111 विविध ठिकाणी सरकारी कार्यालयाना व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत.
गेल्या शुक्रवारी त्रिपुरातील घटनेच्या निषेदार्थ महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. राज्यात 111 ठिकाणी विविध सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना घटनेचा निषेध नोंदवत निवेदन देण्यात आले होते. दरम्यान अमरावती नांदेड व मालेगाव या ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या.रझा अकादमी च्या वतीने 45 ठिकाणी निवेदन देण्यात आले होते तर 70 निवेदने हे अन्य 23 मुस्लिम संघटनाच्या वतीने देण्यात आले होते.या दरम्यान अमरावती नांदेड आणि मालेगावात या तीन ठिकाणीच हिंसक घटना घडल्या होत्या.
पूर्वनियोजित कटामध्ये काचेच्या बाटल्या,हत्यारे आणि मिरची पूड वापरण्यात येते परंतु अशा प्रकारे काहीही घडले नाही.अमरावतीत जवळपास 10 हजार लोकांचा जमाव एकत्र आला होता परंतु त्यापैकी 70 ते 100 तरुण या हिंसक घटना मध्ये सामील असल्याचे दिसून आले आहे.घटने दरम्यान चाकू सुऱ्या या सारखे कोणतेही धारदार शस्त्र सापडले नाहीत. त्यामुळे ही हिंसक घटना पूर्वयोजित होती असे कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत.
ConversionConversion EmoticonEmoticon